Goa : बाणावली : विकासाच्या दिशेने की विद्‍ध्वंसाच्या?

Goa : पर्यटनाला लागतेय गालबोट : प्रदूषण, काँक्रिट जंगले, वेश्‍‍या व्‍यवसाय, ड्रग्‍सचा विळखा धोकादायक
Goa : Citizens expect the beauty and peace of the beach to remain undisturbed in Banavalim Beac.
Goa : Citizens expect the beauty and peace of the beach to remain undisturbed in Banavalim Beac.Dainik Gomantak

मडगाव : प्रदूषणाच्या (Polution) गर्तेत गेलेले किनारे, गावातील शेतजमीन (Agriculture Land) बुजवून उभी झालेली काँक्रिटची जंगले, परप्रांतीय लोकांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे वाढलेली गुन्हेगारी यातून बाणावली मतदारसंघाला (Banavalim Constituency) नष्टचक्र लागले आहे. तथाकथित विकासाच्या नावाखाली मतदारसंघात अनेक प्रवृत्ती शिरल्याने इथली शांतता हरवत चालली आहे. सध्‍या किनारपट्टीतील गावांना पर्यटन व्यवसाय नावाच्या ‘बले’ची दृष्ट लागल्याने प्रदूषणाच्या गर्तेत गेलेले किनारे, गावांतील शेत जमीन बुजवून उभी झालेली काँक्रिट जंगले, परप्रांतीय लोकांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे वाढलेली गुन्हेगारी (Criminal), वेश्याव्यवसाय आणि ड्रग्सचा (Drugs) व्यवहार अशी नवीन ओळख निर्माण झाली आहे.

Goa : Citizens expect the beauty and peace of the beach to remain undisturbed in Banavalim Beac.
Goa Crime: "पेपर स्प्रे" मारून पोलिस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला

कोलवा, बाणावली, केळशी या समुद्र किनाऱ्यांवर एकेकाळी लोक दूरदूरच्या ठिकाणांहून येथे विरंगुळ्यासाठी यायचे. गावातील लोक संध्याकाळच्यावेळी पाय मोकळे करायला या ‘वेळां’वर (किनाऱ्यावर) यायचे आणि घरी जाताना रापणीचे ताजे मासे घेऊन परतायचे. वाटेत कुणी भेटला, तर त्याची आपुलकीने विचारपूसही करायचे. सध्याचा जो बाणावलीचा मतदारसंघ आहे, त्यातील बहुतेक गावात अशीच परिस्थिती होती. त्यामुळे गावात एक आल्हाददायक वातावरण असायचे.
या परिस्थितीबद्दल बोलताना पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्या ज्युडीत आल्मेदा म्हणतात, ‘आमच्या लहानपणी आम्ही सायंकाळी बिनधास्त किनाऱ्यावर फिरायचो. मात्र, आता सायंकाळी घराचा दरवाजा उघडून रस्त्यावर येण्यासही भीती वाटते’. हल्लीच बाणावली किनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याची दुर्दैवी घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर या प्रतिक्रियेकडे पाहावे लागेल.

Goa : Citizens expect the beauty and peace of the beach to remain undisturbed in Banavalim Beac.
Goa:धोकादायक इमारतींची होणार चौकशी

किनाऱ्यावर व्यावसायिकांचा कब्जा
कोलवा ते केळशीपर्यंतची लांबलचक किनारपट्टी एकेकाळी या मतदारसंघाची शान होती. मात्र, पर्यटन व्यावसायिकांनी या किनारपट्टीची आज वाट लावून टाकली आहे. एका बाजूने तारांकित हॉटेल्सनी किनारपट्टीवर अतिक्रमण करताना या किनाऱ्यांवरील असंख्य वाळूच्या टेकड्या गिळंकृत केल्या, तर दुसऱ्या बाजूने शॅक व्यावसायिकांनी आपले सांडपाणी सरळ वाळू खालून पाईप्स नेऊन उघड्यावर सोडण्यास सुरवात केल्याने या किनाऱ्यांवरील प्रदूषण वाढून तापमान वाढीचा धोका निर्माण झाला आहे. कोलवा येथे पर्यटन व्यावसायिकांनी आपले सांडपाणी थेट येथील खाडीत सोडून ती पूर्णपणे प्रदूषित करून टाकली आहे. एका बाजूने किनारपट्टी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली असताना दुसऱ्या बाजूने साळ नदीत मातीचे भराव घालून ती बुजवून तिथून पश्चिम बगल रस्ता प्रकल्प उभा राहत असून त्यामुळेही येथील संपन्न अशी जैववैविधता धोक्यात आली आहे.

पारंपरिक उद्योग धोक्यात
मच्छीमार समाज हा येथील खरा भूमिपुत्र. त्याशिवाय रेंदेर, थवय (सुतार) आणि शेती करणारे शेतकरी हे येथील प्रमुख पारंपरिक व्यावसायिक. एका बाजूने या मतदारसंघात विकासाच्या नावाखाली मोठ मोठी हॉटेल्स आणि इतर बांधकामे उभी होत असताना हे मूळ व्यावसायिक आपल्या व्यवसायापासून दूर जात उदरभरण करण्यासाठी विदेशात स्थायिक होऊ लागले आहेत. येथील मच्छीमारांना अजूनही आपले मासे विकण्यासाठी परप्रांतीय मासळी एजंटवर अवलंबून राहावे लागत आहे. आज तोच या भूमीतून विस्थापित होण्याच्या वाटेवर आहे.

विकासाच्या नावाने विद्‍ध्वंस
भव्यदिव्य प्रकल्प उभारणे आणि त्यावर होणाऱ्या खर्चातून हित साधणे, ही येथील पंचायत सदस्यांपासून आमदारापर्यंतच्या राजकारण्यांची सवय झाल्याने येथे कुठल्याही नियोजनाशिवाय प्रकल्प उभे राहू लागले आहेत, असा आरोप येथील लोक सर्रासपणे करतात. उदाहरणादाखल ते कोलवा येथे उभ्या राहणाऱ्या सांडपाणी प्रकल्पाकडे बोट दाखवतात. या प्रकल्पाचे सांडपाणी थेट समुद्रात सोडण्याची तजवीज असल्याने स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. कोलवा समुद्र किनाऱ्यावर स्वदेश दर्शन योजनेखाली कोट्यवधी रुपये खर्चून सौंदर्यीकरण योजना हाती घेतली असली, तरी त्यासाठी या किनाऱ्यावर असलेले असंख्य माड कापून टाकले आहेत. या मतदारसंघात अशी कित्येक उदाहरणे दिसून येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com