गोव्यातील डिझायनरने कोव्हिड बचावासाठी मल्टी-मास्क डिझाईन केला.

तेजश्री कुंभार
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

पठाणिया म्हणतात, “जगातील सर्वोत्कृष्ट उत्पादनाची निर्मिती करण्याचा विचार होता. सार्वजनिक फंडिंग प्लॅटफॉर्मवर “प्रोटोटाइप स्टेज” मधील उत्पादनांसाठी प्रिसेलिंग महत्वाचे आहे.

मडगाव, 

 दिपक पठाणिया , दक्षिण गोव्यातील इंडस्ट्रीअल डिझाइनर असून त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (अहमदाबाद), येथून शिक्षण घेतले आहे. पठाणिया यांनी कोव्हिडपासून संरक्षणासाठी एका ;मल्टी टास्क मास्क डिझाइन केला आहे.
हा जगातील पहिला मॉड्यूलर मास्क असून भविष्यात महत्वाची भूमिका बजाविणार असल्याचे पठाणिया म्हणाले.
मडगाव येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात डिझाईन इंटरव्हेंशन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संस्थापक संचालक दीपक पठाणिया म्हणाले की, या मल्टी-मास्कची अनेक उपयुक्त वैशिष्ट्ये आहेत, त्यातील एक म्हणजे हा मास्क सध्या वापरल्या जात असणाऱ्या मास्कपेक्षा अधिक संरक्षक आणि फ्रेंडली आहे. पठाणिया यांच्या मते, कंपनीने पेटंटसाठी अर्ज केला असून जगभरातील पेटंट संशोधनात हा प्रॉडक्ट फायनल प्रोटोटाइप स्टेजमध्ये आहे. पठाणिया म्हणाले की, आरोग्य सेवा आणि सुरक्षा सेवा, आतिथ्य आणि किरकोळ कर्मचारी, प्रदूषक घटकांमधील उद्योगातील कामगार आणि मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणाशी लढा देणार्‍या लोकांनी हा मल्टी-मास्क वापरायला हवा. मल्टी - टास्क मास्कमध्ये असणाऱ्या प्रमुख वैशिष्ट्ये ठळकपणे सांगताना पठाणिया म्हणाले की, मास्कचा एर्गोनोमिक आणि मॉड्यूलर आकार सोई आणि योग्य वापर करण्याच्या दृष्टीने बनविला गेला आहे. फेस- शिल्डचा सहजपणे मास्कसोबत कोणत्याही स्ट्रॅपची आवश्यकता नसताना वापरले जाऊ शकते. वापरकर्त्याचा आवाजही अगदी स्पष्टपणे ऐकू येतो. मास्कचे सर्व भाग सहजपणे धुतले जाऊ शकतात ज्यामुळे जैविक-कचरा कमी होतो. मास्कचा वापर इलेक्ट्रॉनिक फिल्टर, ऑडिओ/व्हिडीओ रेकॉर्डिंग यासारख्या गोष्टींसाठीही केला जाऊ शकतो. दिपक यांनी शिल्पा साल्गिया आणि कनिष्क खरबंदा यांच्याबरोबर पार्टनरशिप केली असून मास्क तयार करण्यासाठी ‘मेड इंटरव्हेन्शन्स एंड बियॉन्ड प्रायव्हेट लिमिटेड’ ही नवीन कंपनी स्थापन केली आणि त्यांना गोव्यातील सेंटर फॉर इनक्युबेशन बिझनेस एक्सलरेशन (सीबा) हे सहयोग करीत आहेत. अंतिम डिझाइन, टूलींग आणि उत्पादन प्रक्रियेस मदत करण्यासाठी ते पुणे येथील डिझाइन कंपनीसोबतही सहयोग करीत आहेत. पठाणिया म्हणाले की त्यांनी अमेरिकेत उत्पादन व विक्री करण्यासाठी अमेरिकेत एक सहाय्यक कंपन स्थापन केली आहे. अमेरिकन कंपनीचे संचालक सुदीप साल्गिया हे आयआयटी-मुंबईचे माजी विद्यार्थी असून, कॉर्नेल विद्यापीठात पीएचडी करत आहेत.
सध्या या मास्कला यूएसमधील इंडिगोगो या क्राऊड फ़ंडिंग साईटवरून फिचर केले आहे. पठाणिया म्हणतात, “जगातील सर्वोत्कृष्ट उत्पादनाची निर्मिती करण्याचा विचार होता. सार्वजनिक फंडिंग प्लॅटफॉर्मवर “प्रोटोटाइप स्टेज” मधील उत्पादनांसाठी प्रिसेलिंग महत्वाचे आहे.
दिपक यांनी सांगितले की त्यांचे लोकप्रिय युट्यूब चॅनेल दि, आर्ट ऑफ सायन्स जे की जगातील लोकप्रिय विज्ञानविषयक युट्यूब चॅनेलपैकी एक असून यावर विज्ञानावर आधारित स्टेज फॅबलॅबशो; 2018-19 साली गोव्यातील प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आला होता. अधिक माहितीसाठी कृपया या पेजला भेट द्या - https://www.indiegogo.com/projects/multi-
mask-world-s-first-modular-mask-system/

संबंधित बातम्या