गोमंतकीय कन्येकडून गोवा-डेहराडून विमानाचे उड्डाण

पहिल्या विमानसेवेची ‘कॅप्टन’ : पर्रातील साशा साल्ढाणाचे पर्यटनमंत्र्यांकडून कौतुक
Sasha Saldhana
Sasha SaldhanaDainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘देखो देश अपना’ या उपक्रमातून गोवा आणि डेहराडून (उत्तराखंड)ला जोडणाऱ्या विमानसेवेला सुरुवात झाली. पहिल्या विमानाने मंगळवारी उड्डाणही केले.

या विमानाच्या कॅप्टनचा मान गोमंतकीय कन्येला मिळाला. पर्रा येथील साशा साल्ढाणा हिने यशस्वीरित्या जबाबदारी पार पडली. तिच्या या कामगिरीचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार मायकल लोबो यांच्यासह इतर नेत्यांनी अभिनंदन केले आहे. समाजमाध्यमातूनही साशा हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Sasha Saldhana
In Pictures: पणजीत नवं आकर्षण; गोवा मनोरंजन सोसायटी ते मिरामार अपूर्ण जॉगिंग ट्रॅकचे काम पूर्णत्वाकडे

गोवा आणि उत्तराखंड या दोन राज्यांच्या पर्यटन लँडस्केपमध्ये वाढ करण्यासाठीच्या सहकार्य सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानुसार, गोवा-उत्तराखंड अशी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.

‘इंडिगो’ची आता गोवा ते डेहराडून आणि परत आठवड्यातून ३ थेट उड्डाणे सुरू केली आहेत. हा एक अभिमानाचा क्षण होता की, या विमानसेवेच्या उद्‍घाटनाचे उड्डाण गोव्यातील पर्रा गावातील गोमंतकीय कन्या कॅप्टन साशा साल्ढाणा हिने केले.

Sasha Saldhana
विना कोचिंग क्लास गोव्याच्या लेकीचे UPSC परीक्षेत यश; CM सह सर्वांनी केलं कौतुक

साशाचे लोबोंकडूनही प्रशंसा

सोशल मीडिया हॅण्डलवरून प्रतिक्रिया देताना कळंगुटचे आमदार मायकल लोबो म्हणाले की, गोवा व डेहराडून दरम्यानच्या पहिल्या थेट उड्डाणाचा शुभारंभ आम्ही अभिमानाने साजरा करतो.

या विमानसेवेची कॅप्टन साशा साल्ढाणा ही पहिली अधिकारी म्हणून काम करत आहे. या दोन स्थळांमधला सुरक्षित आणि अखंड प्रवास सुनिश्चित करून हा टप्पा गाठण्यात तिचे अपवादात्मक योगदान महत्त्वाचे आहे.

‘देखो अपना देश’ पहिलाच करार

देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच सामंजस्य करार आहे. जिथे दोन राज्ये पंतप्रधानांच्या ‘देखो अपना देश’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी सहयोग करत आहेत. आणि भविष्यात देशातील उर्वरित राज्यांद्वारे त्याचे अनुकरण केले जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com