ग्रामीण भागात १०० टक्के नळ जोडणी देणारे गोवा हे पहिले राज्य ठरले; जलशक्ती मंत्रालय

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

ग्रामीण भागात अडीच लाख घरांना १०० टक्के नळ जोडणी देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. २०२४ पर्यंत सर्व ग्रामीण घरांना पाईपद्वारे पाणी पुरविणे हे सरकारच्या जल जीवन मिशनचे उध्दीष्ट आहे. असे जलशक्ति मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.

पणजी: ग्रामीण भागात अडीच लाख घरांना १०० टक्के नळ जोडणी देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. २०२४ पर्यंत सर्व ग्रामीण घरांना पाईपद्वारे पाणी पुरविणे हे सरकारच्या जल जीवन मिशनचे उध्दीष्ट आहे. असे जलशक्ति मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.

 गोव्याने देशातील पहिले 'हर घर जल' राज्य बनन्याची प्रतिष्ठा मिळविली आहे. गोव्यातील ग्रामीण भागात अडीच लाख ग्रामीण कुटुंबांना १०० टक्के घरगुती टॅप कनेक्शन (एफएचटीसी) यशस्विरित्या उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती जलशक्ती मंत्रालयाने दिली. 

जल जीवन मिशन (जेजेएम) चा प्रभावीपणे उपयोग करून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुलभ व्हावे या उद्देशाने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व ग्रामीण घरांमध्ये आता नळ असल्याची घोषणा केली. 

जूनमध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी सावंत यांना पत्र लिहून २०२१ पर्यंत ग्रामीण भागात १०० टक्के नळजोडणीच्या राज्य सरकारच्या वार्षिक कृती योजनेबद्दल आनंद व्यक्त केला. ग्रामपंचायतीतील ग्रामीण कुटूंबे नळ जोडणीद्वारे निश्चितपणे पाणीपुरवठा करून "पूर्णपणे संतृप्त" असतात.

पाणी तपासणी सुविधांच्या बळकटीकरणासाठी, राष्ट्रीय चाचणी व कॅलिब्रेशन प्रयोगशाळांसाठी (एनएबीएल) मान्यता मिळालेल्या  पाण्याच्या दर्जाच्या १४ चाचण्या घेण्यासाठी प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार आहे. जल जीवन अभियान प्रत्येक गावात पाच जणांना, विशेषत: महिलांना फिल्ड टेस्ट किट वापरून प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले आहे. जेणेएकरून तेथे पाण्याची चाचणी घेता  येईल. 

"सार्वत्रिक प्रवेश मिळाल्यानंतर, राज्य आता सेन्सर आधारित सेवा वितरण मॉनिटरींग सिस्टमची योजना आखत आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या कामकाजावर नियंत्रण ठेवता येईल. म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी पुरेशा प्रमाणात नियमित आणि दीर्घ मुदतीसाठी प्रत्येक ग्रामीण घरांना पुरविल्या जाणाऱ्या दर्जेदार गुणवत्तेची माहिती मिळविता येईल.

संबंधित बातम्या