वीज खात्यातील कर्मचाऱ्यांना गोवा खंडपीठाने दाखवला घरचा रस्ता

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

वीज खात्यात असिस्टंट डेटा एन्ट्री ऑपरेटर्स (एडीईओ) पदावर पाच वर्षापूर्वी ३२ कर्मचाऱ्यांना सेवेत नियुक्त करण्यात आले होते

पणजी: वीज खात्यात असिस्टंट डेटा एन्ट्री ऑपरेटर्स (एडीईओ) पदावर पाच वर्षापूर्वी ३२ कर्मचाऱ्यांना सेवेत नियुक्त करण्यात आले होते. मात्र ही प्रक्रिया नोकरभरती नियमांचे उल्लंघन करून घेण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरवून जाहिरातीत दिलेले निकष लावून गुणवत्ता यादी करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना सेवेतून घरी जाण्याची पाळी आली आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बडतर्फीची पत्रे स्वीकारण्यास नकार दिल्याने सरकारसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

गोव्यातील खाण व्यवसाय सुरू कऱण्यासाठी आंदोलकांकडून सरकारला 15 मार्चचा अल्टिमेटम -

संबंधित बातम्या