सर्व जनयाचिकेची माहिती चार्ट स्वरूपात सादर करण्याचे गोवा खंडपीठाचे निर्देश

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

गोवा राज्यात(Goa) कोरोना महामारी(Covid-19) संदर्भात हॉस्पिटलमधील(Goa Hospital) बहुतेक समस्या सोडविण्यात आल्या आहेत त्यामुळे सर्व जनयाचिका तग धरू शकत नाही

पणजी: गोवा राज्यात(Goa) कोरोना महामारी(Covid-19) संदर्भात हॉस्पिटलमधील(Goa Hospital) बहुतेक समस्या सोडविण्यात आल्या आहेत त्यामुळे सर्व जनयाचिका तग धरू शकत नाही अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी आज सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा(Goa Court) खंडपीठासमोर दिली.

IVERMECTIN गोळ्यांचा वापर सरकारने अखेर थांबवला; गोवा खंडपीठात खटला दाखल 

यावेळी गोवा खंडपीठाने ही सर्व माहिती चार्ट स्वरूपात सादर करण्याचे निर्देश देऊन ही सुनावणी सोमवार 14 जूनपर्यंत पुढे ढककलण्यात आली आहे. दरम्यान दर्यावर्दीना सरकारने कोरोना योद्धे जाहीर करण्यात आल्याने दर्यावर्दी संघटनेने याचिका मागे घेतल्याने खंडपीठाने ती निकालात काढली.

Goa Board: दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा फायदा द्या! 

दरम्यान गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या  इस्पितळात पहाटे 2 ते 6 या वेळे दरम्यान होणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू रोखण्यास राज्य प्रशासनाने डुरा सिलिंडर्स, तज्ज्ञ ट्रॅक्टर चालक, 323 प्राणवायू कॉन्संट्रेटर्स उपलब्ध करण्याबरोबरच प्राणवायू  साठा टाकी बसविण्याचे काम सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. या कामाचा आढावा अहवाल आरोग्य सचिव रवी धवन यांनी सादर करावा. आणि हा अहवाल समाधानकारक असल्यास सुनावणी घेतली जाईल व अहवाल असमाधानकारक नसल्यास किंवा त्यात आणखी निर्देश देण्याची आवश्‍यकता असल्यास सुनावणी पुढे ढकलली जाईल असे संकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले होते.

 

संबंधित बातम्या