Goa Bench : पोलिसांनी केलेल्या मारहाणप्रकरणी खंडपीठाच्या प्रतिवाद्यांना नोटिसा

पोलिसांनी बेदम मारहाण केलेल्या हनुमंत परब यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका सादर केली आहे.
Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat Election
Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat ElectionDainik Gomantak

Goa Bench : पिसुर्ले - डिचोली परिसरातून खनिजवाहू ट्रकांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला विरोध करण्यासाठी जमा झालेल्या हनुमंत परब याच्यासह इतरांना पोलिसांनी कोठडीत केलेल्या बेदम मारहाणप्रकरणी सादर करण्यात आलेल्या जनहित याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने प्रतिवाद्यांना नोटिसा बजावल्या आहेत व पुढील सुनावणी 29 ऑगस्टला ठेवली आहे.

पोलिसांनी बेदम मारहाण केलेल्या हनुमंत परब यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका सादर केली आहे. याचिकेत मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक सागर एकोस्कर व निरीक्षक प्रज्योत फडते यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकादारतर्फे ॲड. अभिजीत गोसावी हे बाजू मांडत आहेत. खनिजवाहू ट्रकांमुळे पिसुर्ले परिसरातून प्रदूषणाबरोबर तेथील पाण्याचे पाईप फुटून लोकांना पाणीटंचाई होत होती. या खनिजवाहू ट्रकांना गावातून जाण्यास परवानगी नसतानाही ही वाहतूक केली जात होती. त्याला स्थानिकांना आक्षेप घेतला होता व त्यासंदर्भातच्या तक्रारीही दाखल केल्या होत्या. या परिसराची पाहणी करण्यासाठी खाण खात्याचे अधिकारी सकाळी 10.30 वा. येणार असल्याने लोक जमा झाले होते. हे अधिकारी येण्यापूर्वीच तेथे खनिजवाहू ट्रक आल्याने लोकांनी त्याला विरोध केल्यावर उपअधीक्षक सागर एकोस्कर व निरीक्षक प्रज्योत फडते यांनी अडवून त्यांना ताब्यात घेतले होते.

Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat Election
Panjim : नैराश्‍यातून वृद्धाची मांडवी पुलावरून आत्महत्या!

हनुमंत परब याला पोलिस स्थानकात बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या तक्रारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे देऊनही कोणतीच कारवाई मारहाणीत गुंतलेल्या पोलिसांवर झाली नव्हती.

गोवा पोलिसांकडून झालेल्या प्रकरणाची दखल घेतली जात नाही म्हणून याचिकादार हनुमंत परब यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या कार्यालयात 19 मे 2022 रोजी पत्र पाठविले होते. त्या पत्राची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने गोवा मुख्य सचिवांना या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अहवाल मागितला होता. मात्र अजूनपर्यंतही कोणतीच चौकशी सुरू झालेली नाही. या अधिकाऱ्यांनी पिसुर्ले ग्रामस्थांवर केलेले अत्याचार मारहाणीची चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com