मासेमारी हंगामापूर्वी गोव्यातील ट्रॉलर्सना मोठा दणका

खंडपीठाचे निर्देश : एलईडी लाईट्ससह जनरेटर तपासा, त्याशिवाय परवानगी नाही
Fishing boat
Fishing boatDainik Gomantak

पणजी : समुद्रात जाण्यापूर्वी मच्छीमारी ट्रॉलर्सवर एलईडी लाईटस् व जनरेटर नसल्याची तपासणी मासेमारी जेटीवर मच्छिमारी अधिकारी व किनारपट्टी पोलिसांनी करावी. खोल समुद्रातही अधुनमधून तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी देखरेख ठेवावी. मासेमारीसाठी एलईडी लाईट्स किंवा जनरेटरचा वापर झाल्याचे तपासणीत आढळून आल्यास कारवाई करण्यात यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुनावणीवेळी दिले. त्यामुळे ही तपासणी झाल्याशिवाय ट्रॉलर्सना समुद्रात जाण्यासाठीचा परवाना दिला जाणार नाही.

केंद्र व राज्य सरकारने एलईडी लाईटस याचा वापर करून मासेमारी तसेच बुल ट्रॉलिंग करण्यास बंदी घातली आहे. अनेक ट्रॉलर्स जनरेटर घेऊन मासेमारीसाठी जातात. त्याचा वापर ट्रॉलर्सवरील दिवे तसेच जाळे ओढण्यासाठी होत नसून एलईडी लाईटस् व बुल ट्रोलिंग यासाठी खोल समुद्रात करण्यात येत असल्याचा दावा गोवा फाऊंडेशनने सादर केलेल्या याचिकेत केला होता. या एलईडी लाईटस् व जनरेटर ट्रॉलर्सवर मासेमारीसाठी जाताना नसल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात यावे तसेच ही उपकरणे जर ट्रॉलर्सवर आढळून आल्यास त्या ट्रॉलर्सवर कडक कारवाई करत त्यांचा परवानाच रद्द करण्याची मागणी केली होती.

यापूर्वी खंडपीठात प्रलंबित असलेल्या याचिकेसोबत या जनहित याचिकेवर संयुक्तपणे सुनावणी खंडपीठाने घेतली. जनहित याचिकेत राज्यातील जेटीवरील मच्छिमारी सहकारी संस्थांना प्रतिवादी करण्यात आले आहे त्यामुळे खंडपीठाने या संस्थाना नोटीस बजावून पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला ठेवली आहे.

Fishing boat
गोवा काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट!

नोंद असलेल्या अर्ध्याहून समुद्रात बेकायदेशीर मासेमारी सुरू असताना त्याविरुद्ध कारवाई कऱण्यासाठी मच्छिमारी खाते तसेच किनारपट्टी पोलिसांकडे आवश्‍यक प्रमाणात गस्ती नौका नाहीत. मच्छीमारी खात्याकडे पाचपैकी फक्त दोनच गस्ती नौका कार्यरत आहेत तर किनारपट्टी पोलिसांकडे गस्तीसाठी सुसज्ज अशा बोटी नाहीत. प्रत्येक मच्छीमारी जेटीच्या ठिकाणी समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या ट्रॉलर्सना पासेस देण्यात येतात. त्यामुळे ते देण्यापूर्वी ट्रॉलर्समध्ये एलईडी लाईटस् किंवा जनरेटर नाही याची मासेमारी सहकारी संस्थाव्यतिरिक्त मच्छिमारी अधिकारी व किनारपट्टी पोलिसांनी त्याची शहानिशा करावी. ट्रॉलर्स जेटीवर परततात त्यावेळी त्याची तपासणी केली जावी अशी विनंती याचिकादाच्या वकील नॉर्मा आल्वारिस यांनी बाजू मांडताना केली.

तटरक्षक दलाची कारवाई 15 समुद्रातील नॉटीकल माईल्स क्षेत्राबाहेर करता येते. त्यामुळे जेटी येथेच ट्रॉलर्समध्ये जनरेटर व एलईडी लाईटस् ही उपकरणे घेतली जात नाही याची तपासणी करणे आवश्‍यक आहे. खोल समुद्रात दलातर्फे अधुनमधून निगराणी ठेवली जाईल असे स्पष्ट केले. ट्र गोवा ट्रॉलर्स असोसिएशने एलईडी लाईटस् व जनरेटरचा वापर केला जात नसल्याचे स्पष्टीकरण केले.

मासेमारी बंदी काळ 31 जुलैला संपत आहे व 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरू होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर समुद्रात जाणाऱ्या ट्रॉलर्सकडून एलईडी लाईटस् याचा वापर करून होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही जनहित याचिका सादर करण्यात आली आहे.

मच्छिमारी खाते व तटरक्षक दलाने प्रतिज्ञापत्र सादर केले. प्रत्येक जेटीवर सीसीटीव्ही उभारण्यात येतील, 12 गस्ती नौकांकरिता केंद्राकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला, 58 कर्मचारी भरतीला सरकारने मान्यता दिली असून खात्याकडून देखरेख ठेवली जात आहे अशी माहिती देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com