Goa: 'भंडारी समाजाला 19 टक्के विशेष आरक्षण देण्यात यावे'
निवेदन देताना समाज बांधव Dainik Gomantak

Goa: 'भंडारी समाजाला 19 टक्के विशेष आरक्षण देण्यात यावे'

भंडारी समाजाची लोकसंख्येच्या तुलनेत सध्याचे आरक्षण कमी पडत आहे. त्यामुळे अनेक समाज बांधव सरकारी योजना आणि नोकरीपासून वंचित राहतात. या मागणीचे निवेदन समाजाने दिले आहे.

डिचोली: भंडारी समाजाला 19 टक्के खास आरक्षण द्यावे. अशी मागणी गोमंतक भंडारी समाजाने (Gomantak Bhandari Samajane)केली आहे. तशी मागणी करणारे निवेदन समाजाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले आहे.

गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक (Ashok Naik)यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant)यांची साखळी येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून त्यांना समाजाच्या मागणीचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात समाजाचे सरचिटणीस फक्रू पणजीकर, खजिनदार जोगुसो नाईक, डिचोली तालुका समितीचे अध्यक्ष आनंद नार्वेकर आणि महिला विभागाच्या सचिव श्रीमती बुगडे (Bugde)यांचा समावेश होता.

निवेदन देताना समाज बांधव
Goa BJP: डिचोली भाजप ओबीसी मोर्चा समिती जाहीर

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी भंडारी समाज बांधव शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. या मागणीसंदर्भात आपण लक्ष घालणार. असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले. OBC अंतर्गत 19 जाती येत आहेत. भंडारी समाजाची लोकसंख्येच्या तुलनेत सध्याचे आरक्षण कमी पडत आहे. त्यामुळे अनेक समाज बांधव सरकारी योजना आणि नोकरीपासून वंचित राहतात. असे आनंद नार्वेकर (Anand Narvekar)यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.