Goa Bhumiputra Bill: धनगर बांधवांची 415 घरे नावावर होणार

‘भूमी’ विधेयकातून घरांना मालकी मिळाल्यास अनेक अडचणी नाहीशा होतील.
Goa Bhumiputra Bill: धनगर बांधवांची 415 घरे नावावर होणार
Goa Bhumiputra Bill: धनगर समाज बांधवDainik Gomantak

वाळपई: गोवा सरकारने (Goa Government) विधानसभेत संमत केलेले ‘भूमी’ विधेयक (Goa Bhumiputra Bill) हे खरोखरच चांगले असून या बिलाद्वारे धनगर लोकांची घरे नावावर होणार आहेत. धनगर बांधव गेली अनेक वर्षे सत्तरी (Satari) तालुक्यात सरकारी जमिनीत वास्तव्य करून आहेत. पण अजूनही धनगर बांधवांची घरे नावावर नाहीत. घर मालकी नसल्याने घर बांधणी संबंधी योजनांचा फायदा होत नाही. म्हणूनच ‘भूमी’ विधेयक लवकर सरकारने कार्यान्वित केले तर सत्तरी तालुक्यातील 415 धनगर बांधवांची घरे त्यांच्या नावावर होणार आहेत. त्यामुळे ‘भूमी’ विधेयक धनगर समाज संघटना व धनगर बांधव स्वागत करीत असल्याची माहिती गोवा धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष बी. डी. मोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

वाळपई-वेळूस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सगो यमकर, सहसचीव बिरो काळे, पदाधिकारी जयंत वरक, पवन वरक, बाबू पावणे आदींची उपस्थिती होती. मोटे पुढे म्हणाले, ‘भूमी’ विधेयकाला काहीजण विरोध करीत आहेत. पण हे विधेयक अत्यंत गरजेचे असून त्यातील काही त्रूटी दूर करुन विधेयक आणल्यास धनगर बांधवांचा अनेक वर्षांचा घर मालकी विषय मार्गी लागणार आहे.

Goa Bhumiputra Bill: धनगर समाज बांधव
Goa Assembly Elections: काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे राष्ट्रवादी पेचात

काही वर्षापूर्वी अटल आसरा योजने अंतर्गत सरकार दरबारी समाज कल्याण खात्यात 140 धनगर बांधवांनी घर दुरुस्तीसाठी अर्ज केला होते. पण घराला मालकी नसल्याने दुरुस्तीसाठी मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे दुरुस्तीसाठी अडचणी येतात. ‘भूमी’ विधेयकातून घरांना मालकी मिळाल्यास अनेक अडचणी नाहीशा होतील. त्यासाठी सरकारने हे विधेयक लवकरात लवकरच लागू करावे. समाजाच्या बैठकीत याविषयी चर्चाही केली असून सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आह, असेही मोटे म्हणाले.

Goa Bhumiputra Bill: धनगर समाज बांधव
Travelling to Goa? वाचा काय आहेत नवीन नियम

पायवाटेचा प्रश्न

2020 साली पिसुर्ले पंचायतीच्या भागात पिसुर्ले कुंभारखण या मार्गावर एका ठिकाणी असलेली खुद्द पंच असलेल्या संगिता मोटे यांच्या घराकडे जाणारी पारंपरिक वाटेवर गटाराच्या ठिकाणी एकाने मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा घालून बंद केली होती. त्यामुळे मोटे यांची पारंपरिक वाट बंद झाली आहे, अशी माहिती मोटे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com