World Toilet Day 2022: डिचोली तालुका हागणदारी मुक्तीच्या प्रतीक्षेत!

World Toilet Day 2022: जागृतीची गरज : 25 टक्के जनता ‘बायो टॉयलेट’पासून वंचित
Goa News | Toilet Day
Goa News | Toilet DayDainik Gomantak

World Toilet Day 2022: गोवा शंभर टक्के हागणदारीमुक्त राज्य झाल्याचा सरकारकडून दावा होत असला, तरी डिचोली तालुका मात्र अजूनही हागणदारी मुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. केंद्र सरकारने योजना अमलात आणली असली, तरी जागृतीअभावी म्हणा किंवा तांत्रिक कारणामुळे म्हणा आजही अनेकजणांना ‘बायो-टॉयलेट’च्या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

सरासरीचा अंदाज घेतल्यास डिचोली तालुक्यातील 20 ते 25 टक्के जनता स्वच्छतागृहांच्या प्रतीक्षेत आहे. स्वच्छतागृहांअभावी डिचोलीतील बहुतेक भागात आजही नागरिकांना उघड्यावर शौचविधी करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात भाडेकरू मजूर वास्तव्य करतात, त्या भागात तर ही समस्या मोठी आहे.

Goa News | Toilet Day
Aasgao Truck Fire: मडगावनंतर आसगाव येथे आगीची घटना; धावत्या ट्रकला आग, मोठी दुर्घटना टळली

बायो-टॉयलेटची प्रतीक्षा

‘स्वच्छता अभियान मिशन’अंतर्गत तालुक्यातील विविध पंचायत क्षेत्रातील नागरिक अजूनही ‘बायो-टॉयलेट’च्या प्रतीक्षेत आहेत. काहींच्या अर्जांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तर काही जणांनी अजूनही अर्ज केलेले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com