दिवाळीच्या पूर्वसंध्येला डिचोली बाजार फुलला

खरेदी घटली, पोह्यांना मागणी नाही, फळे महागली
डिचोलीच्या आठवडा बाजारात झालेली गर्दी
डिचोलीच्या आठवडा बाजारात झालेली गर्दी Dainik Gomantak

Goa: डिचोलीत सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह पसरला असून, दिवाळीच्या पूर्वदिनी आज बुधवारी डिचोलीचा बाजार (Bicholim market) दिवाळीच्या (Diwali) साहित्याने फुलून गेला होता. त्यातच बुधवार हा डिचोलीच्या आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली होती. सायंकाळी तर प्रचंड गर्दी उसळताना सामाजिक नियमांचाही फज्जा उडाला होता. एकाबाजूने बाजार फुलून गेला असला, तरी बाजारात महागाईची झळ दिसून येत होती. दुसऱ्याबाजूने यंदा मात्र पोह्यांच्या विक्रीत बरीच घट झाल्याचा अंदाज आहे.

डिचोलीच्या आठवडा बाजारात झालेली गर्दी
मत्स्यगंधा एक्सप्रेस मधील प्रवाशांचे साडे सहा लाखांचे दागिने लंपास

दिवाळी साहित्य खरेदी

डिचोलीचा बाजार गेल्या दोन दिवसांपासूनच दिवाळीच्या साहित्याने फुलून गेला आहे. आज सकाळी बाजारात ग्राहकांची संख्या कमी होती. अकरानंतर मात्र बाजारात ग्राहकांची वर्दळ हळूहळू वाढू लागली होती. सायंकाळी तर बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली होती. सामाजिक नियमांचेही तीनतेरा उडाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत रेडिमेड आकाशकंदिल, पणत्या, कारीटे आदी दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी सुरु होती. मिठाई आणि रेडिमेड कपडयांच्या दुकातूनही ग्राहकांची वर्दळ दिसून येत होती. महागाईच्या वणव्यामुळे मात्र यंदा दिवाळी साहित्याच्या खरेदीवर काहीसा परिणाम झाल्याचा सूर दुकानदारांकडून कानी पडत होता.

पोह्यांना मागणी घटली

दिवाळी म्हणजे पोहे आलेच. किराणा दुकानांसह बाजारात गावठी पोहे विक्रीस उपलब्ध झाले आहेत. यंदा मात्र पोहे खरेदीवर परिणाम झाल्याची माहिती विक्रेत्यांकडून मिळाली आहे. डिचोलीत काही राजकीय पक्ष आणि नेत्यांनी दिवाळीची भेट म्हणून आपल्या घरोघरी पोहे वाटप केले आहेत. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदा पोह्यांची खरेदी झालेली नाही. असे बाजारातील एका विक्रेत्यांने सांगितले.

फळांना मागणी

दीपावलीच्या उत्साहात उद्याच लक्ष्मीपूजन होणार आहे. लक्ष्मीपूजन म्हटल्याबरोबर पूजनासाठी पंचफळे आवश्यक असतात. त्यामुळे बुधवारी बाजारात फळांना तेजी आली होती. फळे खरेदी जोरात सुरु होती. 80 ते 100 रुपयांपर्यंत पंचफळे विकण्यात येत होती. बुधवारी दिवसभरात फळ विक्रीतून दीड ते दोन लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com