Goa Diwali 2022: गोव्यातील ग्रामीण भागात गोठा अन् गुरांचे पूजन उत्साहात साजरी!

Goa Diwali 2022: भारत हा कृषिप्रधान देश त्यामुळे परंपरागत आपल्या शेतीकामात गोधनाचा वापर होत आला आहे.
Goa Diwali 2022
Goa Diwali 2022Dainik Gomantak

Goa Diwali 2022: दीपावली हा चैतन्याचा तसेच प्रकाशाचा सण आहे. हा सण सर्वांप्रती आदरभाव व्यक्त करणारा उत्सव. भारत हा कृषिप्रधान देश त्यामुळे परंपरागत आपल्या शेतीकामात गोधनाचा वापर होत आला आहे. त्यामुळे भूतदयेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपल्या संस्कृतीतच आहे. परंतु, आता या सर्व परंपरा मर्यादित झाल्या असल्या तरी राज्यातील ग्रामीण भागात आजही या परंपरा जपल्या जातात.

पाडव्याला गोठा, गवळण, गुरांचे पूजन उत्साहात करण्यात आले. शेणाद्वारे गवळण आणि गोठा बनविणे असो, गोधनाची पूजा असो किंवा जंगलात जाऊन केले जाणारे भोजन असो या सर्व परंपरा ज्या कृषी संस्कृतीशी संबंधित आहेत. अशा परंपरा आजही ग्रामीण भागात जपल्या जातात.

Goa Diwali 2022
Goa Diwali Festival: मयेत शेतकऱ्यांकडून परंपरेचे 'वण्यार' परिसरात जतन

गोधनाची पूजा

बलिप्रतिपदेला गुरांचा पाडवा, असेही संबोधले जाते. कारण या दिवशी आपल्या घरात जेवढे म्हणून गोधन आहे, त्यांचे पूजन केले जाते. त्यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घातल्या जातात. आरती ओवाळली जाते, त्यांना खाण्यासाठी काही भागात पोळे देण्याची प्रथा आहे. या गोधनाच्या पूजनानंतर, गोठ्यात शेणापासून गोठा बनविण्यात येतो.

डिचोली तालुक्यातील मये आणि इतर परिसरातील युवामंडळी पोळे व विविध प्रकारचे खाद्य पदार्थ घेऊन रानात जाऊन भोजन करण्याची प्रथा आहे तर काही भागात धेंडलो फिरविण्याची प्रथा पाहायला मिळते. फोंडा, काणकोणातही ही प्रथा मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे.

Goa Diwali 2022
Goa News: पेडणेत भात खरेदीचा गोंधळ!

ग्रामीण भागात परंपरा कायम

प्रत्येकाच्या गोठ्यात शेणाद्वारे गोठा केला जातो. या गोठ्यात गवळण केली जाते. यासोबतच चूल, जाते, मुसळ आणि घरात लागणारे इतर भांडी कुंडी बनविली जातात. कारटाच्या साहाय्याने गुरे व वासरे केली जातात.

हा शेणापासून तयार केलेला गोठा संध्याकाळी काढला जातो त्यानंतर त्या शेणाची दारातल्या तुळशीशेजारी तुळस केली जाते व दुसऱ्या दिवशी या शेणाच्या शेणी केल्या जातात व त्यानंतर शेणी करण्यास सुरुवात होते. आजही ही परंपरा राज्यातील ग्रामीण भागात अखंडितपणे सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com