Goa: ज्येष्ठ नागरिकांची सेवा ही ईश्वरसेवा- सुभाष फळदेसाई

Goa: ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येकासाठी आदरणीय आणि प्रेरणादायी असतात.
Goa | Second Inning Program
Goa | Second Inning ProgramDainik Gomantak

Goa: ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येकासाठी आदरणीय आणि प्रेरणादायी असतात. त्यांची सेवा केल्यास ईश्वरी सेवेइतकेच पुण्य पदरी पडते, असे मत समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केले. डिचोली येथील बाबा सावईकर सेवा प्रतिष्ठान संचलित ‘सेकंड इनिंग्ज’ या ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राच्या चौदाव्या वर्धापनदिन सोहळ्यात मंत्री फळदेसाई प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

सेकंड इनिंग्जच्या कार्याने आपण भारावून गेलो, असे मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट करून या केंद्राने ‘उम्मीद’ केंद्रे दत्तक घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. या सोहळ्यास खास अतिथी म्हणून आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. अन्य मान्यवरांत डॉ. शेखर साळकर, विश्वस्त रमाकांत शेट्ये, सेकंड इनिंग्जचे कार्यवाह देऊ पळ, लायन्स क्लबचे अध्यक्ष आझाद कडकडे यांचा समावेश होता.

Goa | Second Inning Program
Goa Politics : भाजप विरोधात मोट बांधण्यास विजय सरदेसाईंकडून सुरवात

यावेळी डिचोली लायन्स क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांना कापडी पिशव्या देण्यात आल्या. प्रा. संजीव कडकडे यांनी प्लास्टिक मुक्तीचे आवाहन केले. स्वागत व प्रास्ताविक रमाकांत शेट्ये यांनी केले. देवू पळ यांनी अहवाल सादर केला. मारुती पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर आझाद कडकडे यांनी आभार मानले.

ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

या सोहळ्यात विविध क्षेत्रात योगदान दिलेले रामनाथ देसाई, सुभाष पै आणि पुष्पा सरदेसाई यांचा सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

Goa | Second Inning Program
Goa Company: तुयेतील बंद कंपन्या सुरु करा; अन्यथा जमिनी परत घेऊ!

स्वच्छता दूत शरदचंद्र ढोले, कॅजीटन वाझ, वेंकटेश नाटेकर, सूर्यकांत देसाई, राजाराम खोब्रेकर, गणेश जोशी, पी. व्ही. श्रीकुमार, सुगंधा अडकोणकर, रामचंद्र पळ यांना गौरविण्यात आले. तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com