Single Use Plastic Ban: डिचोलीत प्लास्टिकबंदीचे वाजले तीनतेरा

Single Use Plastic Ban: ‘सिंगल यूज’ पिशव्यांचा पुन्हा वापर; विक्रेत्‍यांकडे सहज उपलब्‍ध; पर्यावरण धोक्‍यात
Single Use Plastic Ban |Goa News
Single Use Plastic Ban |Goa NewsDainik Gomantak

Single Use Plastic Ban: ‘सिंगल यूज’ (एकदाच वापरता येणारी) प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असतानाही डिचोलीत या बंदीच्‍या निर्णयाचे तीनतेरा वाजले आहेत. आता तर फळ-भाजी, मासळी आदी विक्रेत्यांकडे या पिशव्या पुन्हा सहज उपलब्ध होत आहेत. ‘बंदी घातली तरी आम्हाला त्याचे काहीच पडलेले नाही’ अशाच रुबाबात विक्रेते आणि दुकानदार वागत असून या पिशव्या सर्रासपणे वापरताना दिसून येत आहे.

गेल्या 1 जुलैपासून राज्यात ‘सिंगल यूज’ प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी लागू केली आहे. ही बंदी लागू झाल्यानंतर सुरुवातीचा महिनाभर या पिशव्यांच्या वापरावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आले होते.

अधूनमधून पालिका आणि प्रशासकीय यंत्रणेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे विक्रेत्यांनी धसका घेतला होता. हळूहळू कारवाई मंदावली आणि पुन्हा या प्लास्टिक पिशव्या बाजारात दिसू लागल्या.

सिंगल यूज प्लास्टिकच्या पिशव्या विकणारे घाऊक विक्रेते काळजी घेऊन पद्धतशीरपणे या पिशव्या बाजारातील विक्रेत्यांपर्यंत पोहोचवतात. मात्र प्लास्टिक कप, चमचे यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. दरम्‍यान, बाजारात फळ-भाजी किंवा मासळी खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक स्वतः पिशव्या घेऊन येत नाहीत.

तेव्हा त्यांना पिशव्या द्याव्या लागतात. महागड्या पिशव्या देणे परवडत नाही. त्यामुळे सिंगल यूज पिशव्या वापरणे भाग पडते, असे बाजारातील एका भाजीविक्रेत्‍या महिलेने सांगितले.

Single Use Plastic Ban |Goa News
Goa Agriculture: भाताला हवा वाढीव आधारभाव 'खरी कुजबुज'

हा तर सावजाला सावध करण्‍याचा प्रकार

प्रशासकीय अधिकारी लहान विक्रेत्यांवर कारवाई करतात. त्‍यामुळे कारवाई करताना अन्य विक्रेते आणि दुकानदारांना त्याची कल्पना येते. मग सावध होऊन कारवाई टाळण्यासाठी अधिकारी येईपर्यंत ते आपल्‍याकडील प्‍लास्‍टिक पिशव्‍यांचा व्यवस्थित बंदोबस्त करतात.

सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा करणाऱ्यांवर आणि ग्राहकांवर कारवाई झाली तरच बंदीचा निर्णय यशस्वी होऊ शकतो, असे मत एका जागरूक नागरिकाने व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com