गोवा:  दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत राज्यसरकारचा मोठा निर्णय

दैनिक गोमंतक
गुरुवार, 22 एप्रिल 2021

राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा शनिवार 24 एप्रिलपासून सुरू होणार होत्या. मात्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, गोवा फॉरवर्ड पार्टीच्या प्रमुख विजय सरदेसाई आणि अपक्ष आमदार रोहन खौंटे यांनी सरकारला बोर्ड परीक्षा स्थगित करण्याचे आवाहन केले होते.

पणजी : राज्यात कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा घेण्यापूर्वी 15 दिवस आधी विद्यार्थ्याना परीक्षांच्या तारखांबाबत कळवले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. राज्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा शनिवार 24 एप्रिलपासून सुरू होणार होत्या. मात्र कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, गोवा फॉरवर्ड पार्टीच्या प्रमुख विजय सरदेसाई आणि अपक्ष आमदार रोहन खौंटे यांनी सरकारला बोर्ड परीक्षा स्थगित करण्याचे आवाहन केले होते. या आव्हानाचा आणि राज्यातील सद्य स्थिती पाहता राज्यसरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.  (Goa: Finally, the state government postponed the 10th-12th exams) 

गोव्यात नाईट कर्फ्यू लागू. काय सुरु? काय बंद?

दरम्यान, गेल्या आठवड्यातच केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोरखियाल निशांक यांनी देशभरातील कोरोनाचा उद्रेक पाहता दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भारतातील सर्वात मोठ्या बोर्डांपैकी एक असलेल्या उत्तरप्रदेशतील एव्हरल स्टेट बोर्डानेदेखील बोर्ड परीक्षा स्थगित करण्याचा किंवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. मात्र, गोव्यात परीक्षा रद्द करण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. 

भाजप सरकारला एक मिनीट ही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही : दिगंबर कामत

गोव्यातील  इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा येत्या 24 एप्रिलपासून घेण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला होता. तसेच, परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सामाजिक अंतरासह सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जातील,  एका परीक्षा सभागृहात केवळ ११ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी दिली जाईल, असेही प्रमोद सावंत यांनी सांगितले होते. मात्र राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 1500 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे शेवटी राज्यसरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 
 

संबंधित बातम्या