Goa: सायबर गुन्ह्याच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

सायबर गुन्ह्याचे मास्टर माईंड शिवकुमार गॅगवार आणि गुलाम गाैस या दोघांना अटक
Cyber Crime image
Cyber Crime imageDainik Gomantak

Goa: गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने (Goa Crime Branch) दिल्ली व बरेली येथिल पोलिसांच्या मदतीने बरेली (उत्तर प्रदेश) येथे कारवाई करून सायबर गुन्ह्याच्या (Cyber Crime) मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी शिवकुमार गॅगवार आणि गुलाम गाैस (Suspect Shivkumar Gagwar & Gulam Gous) या दोघांना अटक करण्यात केली आहे. व त्यांच्याकडून २५ हून अधिक सीमकार्ड, दहाहून अधिक मोबाईल आणि टॅबलेट व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या. शिवाय कोट्यवधी रुपयांचे व्यवहार असलेले 50 हून अधिक बँक खात्यांची माहिती गोळा केली गेली. अटक केलेल्या दोन्ही संशयितांना बरेली येथील न्यायालयाकडून रविवारी ट्रान्झिट रिमांड घेऊन पुढील चार दिवसांत पथक संशयितांना घेऊन गोव्यात दाखल होणार आहे.

Cyber Crime image
Goa: बाणावली अपघातात खारेबांधचा युवक ठार

या प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांनी गुन्हा शाखेच्या सायबर विभागात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारी नुसार, अज्ञात व्यक्तीने आपला parimalrai@hotmail.com हा ई-मेल अॅड्रेस हॅक करून बनावट ई-मेलद्वारे मित्रांकडून तसेच इतरांकडून पैसे उकळले, या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे यांनी संशयित व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 419, 420 आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66, 66सी, 66डी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Cyber Crime image
Goa: म्हापसा हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्याने केला 2 अल्पवयीन बहिणींचा विनयभंग

या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशी दरम्यान संशयित उत्तर भारतातून व्यवहार करत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर दिल्ली येथे चौकशी करण्यासाठी २३ रोजी रवाना झाले. गोवा पोलिसांच्या सायबर विभागाच्या तसेच दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेशातील बरेली पोलिसांच्या मदतीने निरीक्षक आमोणकर यांनी सायबर गुन्ह्याचे मास्टर माईंड शिवकुमार गॅगवार आणि गुलाम गाैस या दोघांना अटक केली. यासाठी गोव्यातून पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे, उपनिरीक्षक दिवेंद्र पिंगळे तसेच सायबर विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी आवश्यक माहिती पुरवली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com