Goa Biodiversity : बेतकी-खांडोळा जैवविविधता समितीतर्फे पंचक्रोशीतील आरोग्य रक्षकांचा गौरव

खांडोळा ग्रामपातळीवरील जैवविविधता सांभाळणे गरजेचे आहे
Glory To The Health Guards
Glory To The Health GuardsGomantak Digital Team

Goa Biodiversity : खांडोळा ग्रामपातळीवरील जैवविविधता सांभाळणे गरजेचे आहे. आपले जगणे सुसह्य करण्यासाठी जैवविविधता महत्त्वाची आहे. कारण याच जैवविविधतेवर आपले जीवन अवलंबून आहे, असे मत राज्य जैवविविधता मंडळाचे सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी बेतकी-खांडोळा येथे मांडले.

सरपंच विशांत नाईक, उपसपंच संजीवनी नाईक, पंच मनोज गावकर, निकिता फडते, रमिता गावडे, पर्यावरप्रेमी मधू गावकर, पंचायत सचिव रुपेश हळर्णकर, समिती सदस्य उमेश नाईक, राहुल वाडकर उपस्थित होते. यावेळी बेतकी-खांडोळा जैवविविधता समितीतर्फे पंचक्रोशीतील २० आरोग्य रक्षकांचा गौरव करण्यात आला.

Glory To The Health Guards
Mahadayi Water Dispute : हणजूण-कायसूव ‘जैवविविधता’कडून ‘म्हादई’संबंधित ठराव!

सरमोकादम पुढे म्हणाले, पूर्वंजाना सांभाळलेल्या वनसंपत्तीतून विविध औषधे शोधून ग्रामस्थांना रोगमुक्त करणाऱ्या आरोग्यरक्षकांचे कार्य मोठे आहे. त्यांची दखल पंचायतीने घेतली, ही चांगली बाब आहे. यापुढेही आरोग्य रक्षकांनी कार्य सुरू ठेवावे. तसेच आपल्या वनसंपदेचे रक्षण, संवर्धन करावे, आपली विद्या नव्या पिढीकडे सोपवावी.

सरपंच विशांत म्हणाले, ग्रामपातळीवरील वनसंपदेचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असून परिसरातील जैवविविधतेचे रक्षण करण्यात येईल. पंचायत पातळीवर ग्रामस्थांच्या सहकार्याने जैवविविधता सांभाळली जाईल.

Glory To The Health Guards
Yuri Alemao : जैवविविधता नष्ट करण्यासाठी गोव्यात आग माफियांचे कारस्थान

गावकर म्हणाले, जैवविविधतेच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी पाणी आवश्यक आहे. गावातील विविध उपयोगी वनस्पतींचे रक्षण करणेही गरजेचे आहे. स्वागत सरपंच विशांत यांनी केले. सूत्रसंचालन शेखर चोडणकर यांनी केले. उपसरपंच संजीवनी तळेकर यांनी आभारप्रदर्शन केले.

खांडोळ्यात शेकडो वनौषधी :

प्रसुतीपासून ते थंडी, पडसे, काविळसारख्या अनेक व्याधींवर उपयोगी अशा वनस्पती खांडोळा परिसरात आहेत. त्यात परिपाठ, अमृतवेल, घोसेल, पंगारा, जांबूळ, बेल, मेथी, रिठा, पांढरा चाफा, कवच, शमी, बाहाळा, अडुळसा, किरायते अशा शेकडो वनस्पतींबद्दल मधू गावकर यांनी माहिती दिली आणि या वनस्पती सांभाळण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com