आमदार रवी नाईक यांच्या वाढदिनी सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

एरव्ही रवी नाईक यांचा वाढदिन सोहळा म्हणजे प्रत्यक्ष गाठीभेटी व संपर्क साधण्याचा एक अपूर्व असा योग असतो, पण यंदा तो जुळला नाही, असे काही कार्यकर्त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

फोंडा: राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे विद्यमान आमदार रवी नाईक यांच्या  (शुक्रवारी) 18 रोजीच्या वाढदिनानिमित्त त्यांना प्रत्यक्षात शुभेच्छा द्यायला शक्‍य झाले नसल्याने त्यांचे कार्यकर्ते, हितचिंतक तसेच मतदारांत रुखरुख लागून राहिली असल्याचे दिसून आले. एरव्ही रवी नाईक यांचा वाढदिन सोहळा म्हणजे प्रत्यक्ष गाठीभेटी व संपर्क साधण्याचा एक अपूर्व असा योग असतो, पण यंदा तो जुळला नाही, असे काही कार्यकर्त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

कोरोनामुळे यंदा वाढदिन सोहळा साजरा करणे शक्‍य नाही, त्यामुळे आमदार रवी नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी आधीच वाढदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेच्या कारणास्तव भेट देऊ नये, असे आवाहन केले होते. या आवाहनाला अनुसरून कार्यकर्ते, हितचिंतक, मतदारांनी रवी नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेतली नाही, तरीपण बहुतांश जणांनी वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनेल, फेसबूक, व्हॉटस्‌ऍप व मॅसेजीसवरून आपल्या शुभेच्छा दिल्या. प्रसार माध्यमांवर तर शुभेच्छांचा वर्षाव झाल्याचे दिसून आले. सर्वसामान्यांबरोबरच महनीय व अती महनीय व्यक्तींनीही या शुभेच्छा दिल्या.  दरम्यान, चतुर्थीपूर्वी रवी नाईक हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे त्यांनी जनसंपर्क टाळला होता. आताही वाढदिनाला शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी होणार असल्याने सर्वांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रवी नाईक यांनी प्रत्यक्षात शुभेच्छा स्विकारण्याचे टाळले असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

आमदार रवी नाईक यांनी आपल्या वाढदिनानिमित्त संदेश देताना सर्वांनी कोरोनापासून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबियांचा सांभाळ करावा, असे आवाहन करताना मास्क वापरा, सुरक्षित अंतर बाळगा, घाबरू नका, संयमाने कठीण परिस्थितीला सामोरे जा, असा संदेश दिला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या