Goa BJP : ‘संपर्क से समर्पण’ अभियान

सदानंद तानावडे : 1 ते 30 जूनपर्यंत जनतेपर्यंत भाजपचा जागृती उपक्रम
Goa BJP
Goa BJPGomantak Digital Team

राज्यात भाजप ''मोदी सरकार''चे विविध उपक्रम, उपलब्धी आणि विकासात्मक उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी 1 ते 30 जून यादरम्यान ''महासंपर्क अभियान'' हे राज्यव्यापी अभियान सुरू करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली आहे. माजी आमदार दयानंद सोपटे, रुपेश कामत, प्रेमानंद म्हांबरे उपस्थित होते.

तानावडे म्हणाले, 1 ते 5 जून या कालावधीत पक्षाचे मंत्री आणि राज्य नेते प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील (प्रत्येक मतदारसंघातील 50 ) अशा 1000 प्रमुख प्रभावशाली मतदार व्यक्तींना भेट देतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील आणि संपर्क से समर्थन कार्यक्रमांतर्गत त्यांचा पाठिंबा मागतील. 8 ते 12 जून या कालावधीत पक्षाचे नेते आणि कार्यकर्ता हे ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील, जे सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पक्षाच्या कार्यात सक्रिय नाहीत आणि त्यांचा पाठिंबा मागतील.

Goa BJP
Goa Mining: खनिज वाहतुकीतील वर्चस्वासाठी दोन मंत्र्यांमध्ये चढाओढ, भर उन्हात वाहनचालकांनाही वेठीस धरण्याचा प्रकार

ज्येष्ठ मंत्री आणि नेते 9 ते 12 जून रोजी विकासतीर्थ कार्यक्रमांतर्गत प्रसारमाध्यमांसह केंद्र सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या विकास प्रकल्पांना भेट देतील. २ लोकसभा मतदारसंघात 10 जून रोजी डिचोली येथे आणि फोंडा मतदारसंघातील दक्षिण गोवा येथे दुसरे व्यापारी संमेलन होणार आहे.तानावडे पुढे म्हणाले, भाजप मंडळे 13 ते 17 जून या कालावधीत ''संयुक्त मोर्चा संमेलन''चे आयोजन करतील. या कालावधीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 02 कार्यकर्ता संमेलने होतील. 18 ते 22 जूनपर्यंत भाजप मंडळे प्रत्येक ठिकाणी संमेलने आयोजित करणार आहेत.

Goa BJP
Panji Traffic Issue: खंडपीठाकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वेच्छा दखल

विशेष कार्यक्रम

  • योग दिन : 21 जून २०२३. प्रत्येक मंडळात साजरा केला जाईल आणि गेल्या ९ वर्षात केलेल्या विकासकामांचे चित्रण करणारी प्रदर्शनीही लावण्यात येईल.

  • बलिदान दिन : 23 जून २०२३ रोजी, प्रत्येक बूथवर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिवस साजरा केला जाईल. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

Goa BJP
Fire At Mapusa: म्हापसा येथे राहत्या फ्लॅटला आग, लोहिया गार्डन समोरील घटना
  • मन की बात : 25 जून रोजी प्रत्येक बूथवर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मन की बात पाहिली/ऐकली जाईल.

  • काळादिवस : 26 जूनच्या संध्याकाळी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात बौद्धिक व्यक्तींची बैठक होऊन आणीबाणीच्या काळात झालेल्या अत्याचारांची तपासणी काळा दिवस म्हणून करण्यात येणार आहे.

  • माहिती पत्रक वाटप : 20 जून ते 30 जून या कालावधीत बूथ स्तरावरील कार्यकर्ते आणि नेते मोदी सरकारच्या 9 वर्षात केलेल्या कामांची माहिती देणारे पॅम्प्लेट/पुस्तकांचे वाटप करून घरोघरी पोहोचण्याची मोहीम हाती घेतील.

Goa BJP
Goa Mining: खनिज वाहतुकीवरून दोन गटात वाद; कुडचडे येथे ट्रक अडविले

51 रॅली काढणार

एक महिन्याच्या कालावधीत भाजप देशभरातील ५१ रॅली करणार असून काही रॅली गोव्यात होतील. ज्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. या कार्यक्रमाचे दोन केंद्रीय प्रभारी सीटी रवी - राष्ट्रीय सरचिटणीस (उत्तर गोवा) आणि राजीव चंद्रशेखर (दक्षिण गोवा) हे देखील या काळात गोव्यात येतील आणि आपापल्या मतदारसंघाचा दौरा करतील आणि विविध कार्यक्रमात सहभागी होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com