'लसीकरणावरुन कॉंग्रेस राजकारण करु पाहतयं' गोवा भाजप आरोप

SADANAD 1.jpg
SADANAD 1.jpg

पणजी: काँग्रेस पक्ष (Congress party) कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणावरुन (vaccination) राजकारण करू पाहत आहे. लसीकरण सुरू होऊन आता कित्येक महिने झाल्यानंतर काँग्रेसला आता सर्वांचे लसीकरण  झाले पाहिजे अशी मागणी करण्याची आठवण झाली आहे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी आज लगावला.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत,(Digambar Kamat) गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बीना नाईक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वरद म्हार्दोळकर, प्रदेश उपाध्यक्ष जनार्दन भंडारी आदींनी सर्वांना मोफत लसीकरण झाले पाहिजे अशी मागणी करणारे निवेदन राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन यांच्याकडे सादर केले. हे निवेदन राष्ट्रपतींना उद्देशून लिहिलेले आहे. (Goa BJP alleges Congress wants to do politics through vaccination)

त्यावर टिप्पणी करताना तानवडे म्हणाले, की गेले तीन दिवस मडगाव येथे लसीकरण सुरू होते. विरोधी पक्षनेते कामत तिथे फिरकलेही नाहीत. भाजपचे कार्यकर्ते लसीकरण यासाठी लोकांना घेऊन येत होते. त्यांना अटकाव करण्यासाठी ते शेवटच्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे पोचले होते. काँग्रेसला केवळ लसीकरणातून राजकारण करायचे आहे.

गोवा हे छोटे राज्य असल्याने सर्वाना लस मिळेल याची व्यवस्था सरकार करत आहे. लस पुरवठा हा केंद्र सरकारच्या हातात असल्याने उपलब्ध होणाऱ्या लसी पुरवून त्या विविध केंद्रावर पोहोचवल्या जात आहेत. पंचेचाळीस वर्षांवरील लोकांसाठी असलेली लस इतर वयोगटासाठी वापरता येत नाही ती त्याच वयोगटासाठी वापरावी लागते असे निर्बंध आहेत. त्याचे पालन करावे लागते यामुळे त्या वयोगटासाठी उपलब्ध असलेल्या लसी 18 ते 24 वयोगटातील साठी वापरता येत नाहीत. कॉंग्रेसला लोकांशी एवढी चिंता होती तर त्यांनी लसीकरण केंद्रावर जसे मतदारांना नेण्यात येते त्या पद्धतीने लसीकरणासाठी लोकांना न्यावे त्यांच्यासाठी रहदारीची सोय करावी आणि सर्वजण लोक घेतील याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आपणही काही करायचे नाही आणि दुसऱ्याना काही करू द्यायचे नाही, यातून केवळ राजकारण करता येते यातून जनकल्याण होत नाही, असा टोलाही तानावडे यांनी लगावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com