Goa BJP: डिचोली भाजप ओबीसी मोर्चा समिती जाहीर

अध्यक्षपदी कमलेश तेली यांची नियुक्ती (Goa BJP)
Goa BJP: डिचोली भाजप ओबीसी मोर्चा समिती जाहीर
डिचोली भाजप (Goa BJP) ओबीसी मोर्चा समिती जाहीरतुकराम सावंत / दैनिक गोमन्तक

Goa BJP: डिचोली भाजप ओबीसी मोर्चा (Bicholim BJP OBC Morcha) समितीच्या अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष कमलेश तेली (President Kamlesh Teli) तर सरचिटणीसपदी सज्जन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर आणि गोवा प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष गिरीष उसकैकर यांच्या उपस्थितीत डिचोली भाजप मंडळाचे सरचिटणीस डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी ही समिती जाहीर केली.

डिचोली भाजप (Goa BJP) ओबीसी मोर्चा समिती जाहीर
संशयास्पद मृत्यू : ‘कंचना-3’मध्ये आलेक्झेंड्राने साकारली होती भूमिका

दीनदयाळ सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी डिचोली मतदारसंघाचे प्रभारी संतोष मळीक, प्रदेश भाजप महिला मोर्चाची सरचिटणीस शिल्पा नाईक, डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर, सचिव तुळशीदास परब आणि विठ्ठल करमळकर, शेखर परवार आदी उपस्थित होते. गिरीष उसकैकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विश्वास गावकर यांनी स्वागत केले. कौस्तुभ पाटणेकर यांनी आभार मानले.

डिचोली भाजप (Goa BJP) ओबीसी मोर्चा समिती जाहीर
Goa: कोळसा प्रदूषणाच्या पहाणीसाठी केंद्रीय तपास पथक एम पी टीमध्ये दाखल

डिचोली मतदारसंघ ओबीसी मोर्चा समिती पुढीलप्रमाणे- अध्यक्ष - कमलेश तेली, सरचिटणीस - सज्जन नाईक, उपाध्यक्ष - आनंद वेर्णेकर, सचिव - प्रवीण मांद्रेकर, सदस्य - भारत नाईक, दत्तेश खर्बे, ज्ञानेश्वर राऊळ, सुदीन परवार, अनिरुद्ध बिचोलकर, पांडगो शिंगाडी, अनुज वरक, विष्णू मांद्रेकर, ऋषिकेश पेडणेकर, योगेश डिचोलकर, शिवदास मोरजकर, रत्नाकर साखळकर, मर्तुलो मांद्रेकर, सिद्धेश कांबळी, कृपेश मांद्रेकर, कृतेश नार्वेकर आणि राज मांद्रेकर.

Related Stories

No stories found.