पणजीतील महालक्ष्मी मंदिरात जे. पी. नड्डा यांची लक्षणीय उपस्थिती

गुरुवारी ते सत्तरी आणि डिचोली तालुक्यांतील बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला लावणार उपस्थिती..
पणजीतील महालक्ष्मी मंदिरात जे. पी. नड्डा 
यांची लक्षणीय उपस्थिती
Goa BJP : भाजप अध्यक्ष जेपी नड्डाजी यांनी गुरुवारी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला.Dainik Gomantak

Goa BJP : भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरते, उत्पल पर्रीकर आणि इतर भाजप समर्थकांच्या उपस्थितीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डाजी यांनी गुरुवारी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला. जे. पी. नड्डा (J. P. Nadda) बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस गोव्याच्या दौऱ्यावर आले असून आज बुधवारी त्यांचे रात्री उशिरा गोव्यात (Goa) दाबोळी विमानतळावर आगमन झाले.

Goa BJP  : भाजप अध्यक्ष जेपी नड्डाजी यांनी गुरुवारी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला.
गोव्यातील खाणींचा होणार लिलाव
(BJP) National President J. P. Nadda
(BJP) National President J. P. Nadda Dainik Gomantak

दरम्यान त्यांच्या स्वागताला दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन मंत्री सतिश धोंड यांनी उपस्थिती दाखवली.

गुरुवारी ते सत्तरी आणि डिचोली तालुक्यांतील बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत. तसेच साखळीतील बूथ समित्यांचाही आढावा घेणार आहेत. दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस सोमवारी गोव्यात आले होते. फडणवीस यांनी सोमवारी मांद्रे मतदारसंघातील दोन कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com