Goa BJP: भाजपचे ‘सिक्वेरास्त्र’ कळंगुट भेदू शकेल?

त्रिमूर्ती’ त फूट : लोबोंच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न
Goa BJP
Goa BJP Dainik Gomantak

Goa BJP (मिलिंद म्हाडगुत): शेवटी भाजपने कळंगुटची उमेदवारी कळंगुटचेच माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना दिली. मायकल लोबोंनी (Michael Lobo) कॉंग्रेस प्रवेशानंतर निर्माण केलेल्या प्रश्नचिन्हाला भाजपने जोसेफद्वारा उत्तर देऊन टाकले. लोबो कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजप ‘हेवीवेट’ राजकारण्याच्या शोधात होते. लोबोंनी जेव्हा कॉंग्रेस प्रवेश केला तेव्हा माजी आमदार आग्नेल फर्नांडिस (Agnel Fernandes), जोसेफ सिक्वेरा व ॲंथनी मिनेझीस यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. तिघेही मायकल विरोधात बरोबर प्रचार करताना दिसत होते. पण आता जोसेफनी तृणमूलला ‘बायबाय’ करून भाजपमध्ये (BJP) उडी घेतली आहे. जोसेफ हे कळंगुट मतदारसंघातील मोठे राजकारणी असले तरी ते लोबोंना किती लढत देऊ शकतील, हे सांगणे कठीण आहे.

Goa BJP
Goa Election: राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी 12 जागा लढवणार

2012 साली लोबो यांनी जेव्हा प्रथमच भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली तेव्हा जोजेफ त्यांच्याबरोबर होते. त्यावेळी त्यांना कॉंग्रेसचे (Congress) तत्कालीन आमदार आग्नेल फर्नांडिस यांना पराभूत करायचे होते. ते त्यांच्या उद्दिष्टात सफलही झाले. पण नंतर मायकल यांच्याशी त्यांनी ‘पंगा’ घेणे सुरू केले. आणि त्यामुळेच 2017 साली ते मायकलच्या विरोधात रिंगणात उतरले. पण त्यावेळी भाजपची लाट नसूनही लोबोंनी जोसेफना 3811 मतांनी पराभूत केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या हातातून कळंगुट पंचायत हिसकावून घेतली. त्यामुळे त्यांनी आग्नेल फर्नांडिस व ॲंथनी मिनेझीस यांच्याशी सोयरीक जुळवून मायकलचा पराभव, हे उद्दिष्ट ठरविले. कॉंग्रेसची उमेदवारी तिघांपैकी एका मिळेल, असे वाटत होते. पण मायकलच्या अनपेक्षित भाजप प्रवेशामुळे समीकरणे बदलली. असे असले तरी मायकलचे कळंगुट मतदारसंघावर असलेले वर्चस्व कमी झालेले नाही.

Goa BJP
Goa: मुख्यमंत्री सावंत यांनी नजर भिडवून बोलावे: लक्ष्मीकांत पार्सेकर

मायकलने कळंगुटवर आपला असा जो प्रभाव सोडला आहे तो कायम आहे. 2017 मध्ये त्यांनी माजी मंत्री दयानंद मांद्रेकर तसेच दिलीप परूळेकर यांचा शिवोली व साळगाव मतदारसंघात पराभव घडवून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला होता हे सर्वज्ञात आहे. एवढेच नव्हे तर भाजपला तेरा जागा मिळूनही सरकार घडविण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. हे पाहता त्यांचा केवळ कळंगुटवरच नव्हे तर बार्देशातील काही मतदारसंघावर प्रभाव असल्याचे जाणवते. त्यामुळे त्यांना कळंगुट मतदारसंघात हरविणे तरी कठीणच वाटते. कळंगुटमध्ये कॉंग्रेस व भाजपची जेवढी मते आहेत, त्यापेक्षा अधिक मते ही स्वतः लोबोंची आहेत. तसे जोसेफ बद्दल म्हणता येणार नाही. 2017पर्यंत जोसेफ जेवढे ‘लाईम लाईट’ मध्ये होते. तेवढे आता नाहीत. त्यात पुन्हा एरव्ही हाती असलेली कळंगुट पंचायतही त्यांच्याकडे नाही. पण तरी भाजपने ‘जोसेफ अस्त्र’ लोबोंवर सोडण्याचे ठरविले आहे. एरव्ही ही उमेदवारी भाजपचे जुने कार्यकर्ते गुरुदास शिरोडकर यांना मिळणार होती. पण लोबों विरूध्द ‘कॅथलिक कार्ड’ वापरण्याच्या हेतूने भाजपने जोसेफला लोबोंवर सोडले आहे.

या तीन मतदारसंघात कॉंग्रेस तशी मागेच पडली होती. आणि लोबो नसते तर यावेळी त्यात विशेष बदल दिसला नसता याचकरिता सध्या तरी लोबो हा कॉंग्रेसचा बार्देशमधला तारणहार बनला आहे. आणि असे असताना जोसेफची भाजपमधील ‘एंट्री’ त्यांच्यावर विशेष परिणाम करेल, असे वाटत नाही. कळंगुटमध्ये तर नाहीच नाही. लोंबोनी भाजपद्वारा 450 कोटी रुपये केले, कळंगुट मतदारसंघाचा विध्वंस केला,असे जरी जोसेफनी लोबो वर आरोप केले असले तरी त्याला राजकीय वास येत असल्याचे दिसत आहे. निवडणूकीतले आरोप यामुळेच लोक गांभीर्याने घेत नसतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com