बिहारमधील विजयाबद्दल भाजप मंडळातर्फे पंतप्रधानांचे अभिनंदन

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

बिहार राज्यातील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याबद्दल फोंडा तालुक्‍यातील चारही मतदारसंघातील भाजप मंडळच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.

बोरी: बिहार राज्यातील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याबद्दल फोंडा तालुक्‍यातील चारही मतदारसंघातील भाजप मंडळच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन केले.

हा अभिनंदनाचा कार्यक्रम बुधवार ११ रोजी एनआरआय आयुक्त व माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या फोंडा येथील कार्यालयात झाला. फोंड्यातील भाजप मंडळाचे अध्यक्ष शांताराम कोलवेकर, शिरोडा भाजप मंडळचे अध्यक्ष सुरज नाईक, मडकईचे माजी भाजपा अध्यक्ष तुळशीदास नाईक, सतीश सबनिस व सुवर्णा यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या