Goa Political Tourism: आपविरोधात भाजपचं खोचक ट्विट

ताजी हवा घेण्यासाठी भाजपने केले केजरीवालांचे गोव्यात खोचक स्वागत
Goa Political Tourism: आपविरोधात भाजपचं खोचक ट्विट
Goa BJP criticizes Arvind Kejriwal over rising pollution in DelhiDainik Gomantak

पणजी: देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच खालावलेली हवेची गुणवत्ता सुरळीत होण्याचे नाव घेत नाही. CPCB च्या आकडेवारीनुसार, दिल्लीत सकाळी 8 वाजता AQI 389 नोंदवला गेला. 400 च्या वर एयर क्वालिटी इंडेक्स (AQI) गंभीर श्रेणीमध्ये गणला जातो. दरम्यान, केंद्र सरकारने प्रदूषणाबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

Goa BJP criticizes Arvind Kejriwal over rising pollution in Delhi
गोवा भाजप सरकारकडून रोजगाराच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल

गोव्यात ताजी हवा घेण्यासाठी केजरीवालांचे स्वागत

आता दिल्लीचे मुख्यमंत्री सतत गोवा दौऱ्यावर असतात. गोव्यातील आम आदमी पक्षाने निवडणूकीसाठी जय्यत तयारी केलेली दिसत आहे. दरम्यान प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यंमत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल आज दुपारी पुन्हा एकदा गोवा दौऱ्यावर येणार आहे. गोवा भाजपकडून दिल्लीतील वातावरणाचा अंदाज घेत आणि केजरीवाल यांच्या आजच्या गोवा दौऱ्याहून खोचक ट्विट केले आहे. #राजकीय पर्यटन असे लिहित केजरिवाल यांना टॅगही केले आहे. "आम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे गोव्यात स्वागत करतो. गोव्यात ताजी हवा आहे श्वास घेण्यासाठी पुरक वातावरण आहे. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या संकटातून विश्रांती घेण्यासाठी आपण गोव्यात येत आहेत आपले स्वागत आहे." असे खोचक ट्विट करत भाजपने आम आदमी पक्षाचे नेते केजरिवालांवर निशाणा साधला आहे.

राजधानी झाली प्रदुषित

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) 24 तासांच्या सरासरी आकडेवारीनुसार, दिल्लीत सकाळी 7 वाजता PM 2.5 220 मायक्रोग्राम प्रति घनमीटर, तर PM 10 365 ug/m 3 होता. सोमवारी संध्याकाळनंतर हवेची गुणवत्ता पुन्हा खराब होऊ लागली आणि अनेक प्रदूषण निरीक्षण केंद्रांमध्ये वास्तविक वेळेनुसार 300 पेक्षा जास्त AQI दिसायला लागले आहेत. त्याचवेळी दिल्लीत थंडीनेही दार ठोठावले आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानातही घट झाली आहे. आज सकाळी बहुतेक ठिकाणी दृश्यमानता 500-2000 मीटर होती, तर दिल्लीच्या सफदरजंग भागात 800 मीटर इतकी नोंदवली गेली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com