भाजपाला हुकुमशाह म्हणणाऱ्यांनी काँग्रेस राजवटीतील आणिबाणी आठवावी

भाजपने पाळला काळा दिवस
Black Day
Black Day Dainik Gomantak

सासष्टी: 25 जून 1975 रोजी स्व. इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना काँग्रेसने देशात आणिबाणी जाहीर केली होती. हा दिवस काल भारतीय जनता पक्षाने काळा दिवस म्हणुन पाळला. दक्षिण गोवा भाजप दिल्हा कार्यालयात या दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भाजपाला हुकुमशाह म्हणणाऱ्यांनी प्रथम काँग्रेसच्या राजवटीतील आणिबाणीचा काळ आठवावा असे मुख्य वक्ते मिनानाथ उपाध्ये यानी सांगितले. (Goa BJP criticizes National Congress )

Black Day
गोव्यात 'ओला'साठी सरकार सकारात्मक

भारताचा इतिहास सातत्याने आठवण करीत राहणे गरजेचे असून जर आम्ही देशात आणिबाणी जाहीर केली. तो इतिहास समजुन घेतला नाही तर आमची पुढील पिढी आम्हाला माफ करणार नाही असेही उपाध्ये म्हणाले. काँग्रेसच्या राजवटीत त्यांना बाधक अशी घटनेतील कलमे दुरुस्त करण्याची मालिकाच त्यानी चालू केली होती.

Black Day
गोव्यात कोरोनाचे दोन बळी; नव्या 112 रुग्णांची भर

केवळ सत्ता सांभाळण्यासाठीच ही आणिबीणी जाहीर करण्यात आली होती असेही उपाध्ये यानी सांगितले. काँग्रेसच्या राजवटीत नागरीकांच्या मुलभूत अधिकारांना सुद्धा कात्री लावण्यात आली. जेव्हा जेव्हा देशावर संकट ओढवले तेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेऊन त्याचा प्रतिकार केला असेही उपाध्ये यानी कार्यकर्त्यांना सांगितले.या प्रसंगी भाजपचे सरचिटणीस दामू नाईक, अॅड. नरेंद्र सावईकर. उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, आमदार उल्हास तुयेकर यांच्यासह दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com