Goa: भाजप सरकार आयुष डॉक्टरांचे मानधन वाढवण्यात अपयशी; गोवा फॉरवर्ड

गोवा फॉरवर्ड पार्टीने काही महिन्यांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि कोविड रुग्णांसाठी काम करणाऱ्या या अंदाजे 82 आयुष डॉक्टरांना योग्य पगार द्यावा अशी मागणी केली होती.
Goa: भाजप सरकार आयुष डॉक्टरांचे मानधन वाढवण्यात अपयशी; गोवा फॉरवर्ड
Goa: भाजप सरकार आयुष डॉक्टरांचे मानधन वाढवण्यात अपयशी; गोवा फॉरवर्ड Dainik Gomantak

मडगाव: राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) विनंतीनंतरही आयुष डॉक्टरांचे पगार वाढवण्यात आणि त्यांना थकबाकी आणि वेतनवाढ देण्यात गोवा सरकारला अपयश आल्याचे गोवा फॉरवर्ड पार्टी (जीएफपी) चे संघटनमंत्री दुर्गादास कामत यांनी म्हटले आहे. ज्या डॉक्टरांनी कोव्हीड काळात लोकांना सेवा दिली आणि देत आहे त्यांच्या मागण्यांवर सरकारने दुर्लक्ष केल्या बद्दल कामत यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Goa: भाजप सरकार आयुष डॉक्टरांचे मानधन वाढवण्यात अपयशी; गोवा फॉरवर्ड
Goa Elections: कुंभारजुवे मतदारसंघांमध्ये आपलेच प्राबल्य;पांडुरंग मडकईकर

गोवा फॉरवर्ड पार्टीने काही महिन्यांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि कोविड रुग्णांसाठी काम करणाऱ्या या अंदाजे 82 आयुष डॉक्टरांना योग्य पगार द्यावा अशी मागणी केली होती. तथापि, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी (वित्त), लेखा सहसंचालकांना पत्र लिहुनही, अद्याप या संदभार्तील फाईल पास करण्यात भाजप सरकार अपयशी ठरला आहे. "कोविड रूग्णांवर उपचार करून ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला आहे त्यांना कमी पगार देणे हे सरकारचे लज्जास्पद कृत्य आहे. केवळ चांगल्या सुविधाच नाही तर त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा." असे कामत म्हणाले.

" 16 जुलै 2021 रोजी लेखा विभागाला पत्र मिळाल्यानंतरही, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ही विशिष्ट फाईल का पास करत नाहीत हे मला समजत नाही. त्यांचे वेतन न वाढवून ते त्यांना वेदना का देत आहेत?" असा प्रश्न कामत यांनी केला आहे. "गोवा सरकारने या आयुष डॉक्टरांना न्याय देण्याची गती वाढवण्याची गरज आहे. न्यायनादास विलंब म्हणजे अन्यायच आहे." असे कामत यांनी म्हटले आहे.

Goa: भाजप सरकार आयुष डॉक्टरांचे मानधन वाढवण्यात अपयशी; गोवा फॉरवर्ड
अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल

त्यांनी डॉ.प्रमोद सावंत यांना प्रश्न केला आहे की त्यांचा लेखा विभाग त्यांचे ऐकत नाही का?"प्रमोद सावंत यांनी या विषयावर तातडीने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, अन्यथा असे स्पष्ट होईल की त्यांना आश्वासने देण्याची सवय आहे आणि नंतर ते आपली आश्वासने विसरतात." असे ते म्हणाले. कामत यांनी नमूद केले की हे डॉक्टर कोविडसाठी आणि नियमित राष्ट्रीय आरोग्य मिशनसाठी फक्त 20, 000 रुपये पगारावर काम करत आहेत. "डॉक्टर आमचे प्राण वाचवतात, म्हणून त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. हे लज्जास्पद आहे की सरकार त्यांच्या मागणीला प्राधान्य देत नाही." असे कामत यांनी निदर्शनास आणले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com