आमदार सरदेसाई यांचे आरोप सत्ता नसल्याच्या नैराश्यातून; BJP आक्रमक

मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सरदेसाई यांच्यावर साधला निशाणा
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत निती आयोगाने दिलेली आकडेवारीलपवण्याचा प्रयत्न केला आहे. गोव्यात 1 लाखांहून अधिक बेरोजगार असल्याची आकडेवारी ही सांख्यिकी खात्याने तयार केलेली आहे. या विषयांचा संदर्भ देत गोवा फॉरवर्डेचे आमदार विजय सरदेसाईंनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर आज टीकास्त्र सोडले आहे. या आरोपाचे खंडन गोवा भाजपने केले आहे.

(Goa BJP has refuted the allegations of MLA Vijay Sardesai)

Goa BJP
Mormugao: मच्छीमारांना 32 मोटर्सचे वितरण; CSR चा लोकोपयोगी कामासाठी वापर करण्याचे आमदार आमोणकरांचे आवाहन

आरोपाचे खंडन करताना भाजप प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर म्हणाले की, आमदार सरदेसाई हे सत्ता नसल्याच्या नैराश्यातून अशा प्रकारची वक्तव्य करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी यापुर्वीच सांगितले आहे, आमदार सरदेसाई हे भाजपात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र या प्रस्तावाला भाजपने नाकारल्याने सरदेसाई सैरभैर झाले आहेत. सरदेसाई हे एखाद्या लोकप्रतिनिधीला 'माकड' सारखा शब्द वापरु शकतात यावरुनच ते नैराशाचा सामना करत असल्याचं स्पष्ट होते असे वेर्णेकर म्हणाले.

Goa BJP
Water Pollution: डिचोली नदीपात्र गढूळ; नागरिकांत घबराट

यावेळी वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला. राजकारणात विरोधक असावेत, प्रगतीसाठी त्यांची गरज आहेच. मात्र प्रत्येक बाबतीत विरोध करणे हे काही योग्य नाही. कारण भाजपला गोव्याचा विकास करावयाचा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. मात्र बिनबूडाचे आरोप करत असाल तर यातील सत्य गोव्याची जानते असा टोला सरदेसाई यांना लगावला. यावेळी वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो ,भाजप प्रवक्ते, गिरिराज पै वेर्णेकर, तसेच आमदार दाजी साळकर हे उपस्थित होते.

काय म्हणाले होते आमदार सरदेसाई

 गोव्यात मुख्यमंत्री मनमानी करत असून त्यांना कुणीही याबाबत विचारणा करण्यास तयार नाही. मात्र गोव्यात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले असून संधी मिळाल्यास विश्वजीत राणे, दिगंबर कामत हे दोघेही या पदावर दावा करु शकतात असंही सरदेसाईंनी सांगितलं आहे. तसेच गोवा राज्यातील बेरोजगारीसह अनेक वेगवेगळ्या प्रश्नांवरुन गोवा सरकार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर टीका केली आहे. यावरुनच गोवा भाजपने सरदेसाई यांचे आरोप परतवण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com