आठ महिन्यांनंतर गोवा जिल्हा पंचायत निवडणूकीत पुन्हा एकदा धुरळा

In Goa BJP has started creating atmosphere by taking a meeting as soon as elections are not declared
In Goa BJP has started creating atmosphere by taking a meeting as soon as elections are not declared

सांगे: आठ महिन्यांनंतर परत एकदा जिल्हा पंचायत निवडणूक धुरळा उडण्यास सुरवात झाली असून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस पक्ष जोमात आहे. निवडणूक जाहीर न होताच भाजप सभा घेऊन वातावरण निर्माण करू लागला आहे. त्या पाठोपाठ काँग्रेस पक्ष या ना त्या कारणाने लोकांसमोर जात आहे. त्या मानाने अन्य पक्षाचे उमेदवार निवडणूक आयोग मतदानाची तारीख जाहीर करणार म्हणून प्रतीक्षा करत राहिले. गेल्या आठ महिन्यांनंतर मतदारांना किमान आठवण करण्यासाठी एकदा तरी भेट देण्यासाठी उमेदवार कमी पडला तरीही गेल्या प्रचारात किती काम केले होते आणि किती खिरापत वाटली यांची मोजदाद आता उपयोगी येणार नाही. आठ महिन्यानंतर गेल्या वेळेचा विचार आणि प्रचार मतदार विसरून गेले आहे. आता नव्याने प्रचार करायला ना सवड नाही माया अशी काही उमेदवारांची परिस्थिती झाली आहे. 


रिवण मतदारसंघ जिल्हा पंचायत निवडणुकीत आजच्या घडीला भाजप उमेदवार सुरेश केपेकर आणी काँग्रेस पक्षाचे अभिजित देसाई या दोघा उमेदवारांचा चांगला प्रचार झाला आहे. रिवण मतदारसंघात या दोन्हीही राजकीय पक्षाचे काम आहे, पारंपरिक आपापले मतदार आहेत. अन्य उमेदवार अजूनही आपला प्रभाव निर्माण करू शकले नाहीत. खरी लढत होणार ती भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार गजानन रायकर यांच्यात. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे मतदान झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com