भाजपचे दोन अंकी आमदार निवडून येणे अशक्य: विरोधी पक्षनेते दिगंबर कामत

Goa: BJP will not get even double-digit seats in upcoming assembly elections says Digambar Kamat
Goa: BJP will not get even double-digit seats in upcoming assembly elections says Digambar Kamat

पणजी: सन २०१२ मध्ये लोकांची दिशाभूल करुन भाजपने सत्ता मिळवली व सन २०१७ मध्ये अलोकशाही मार्गाने सत्ता काबीज केली. आज भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरले असून, गोवा राज्याला आर्थिक दिवाळखोरीत ढकलण्याचे काम भाजपने केले आहे. असंवेदनशील व लोक भावनांचा आदर न करणाऱ्या भाजपला २०२२ च्या निवडणुकांत दोन अंकी आमदार निवडून आणणे शक्य होणार नाही असा आत्मविश्वास दिगंबर कामत यांनी व्यक्त केला. 

आगामी विधानसभा निवडणुकांत राज्यातील भाजपची असंवेदनशील व भ्रष्ट राजवट संपविण्यासाठी गोव्यातील जनता आज काँग्रेस पक्षाकडे आत्मविश्वासाने पाहत आहे. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांच्या भावनांचा आदर राखून, स्वत: कष्ट सोसून जनतेचे त्रास कमी करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दक्षिण गोव्यातील काँग्रेस गट अध्यक्षांच्या पहिल्या गटाच्या बैठकित बोलताना केले. आज काँग्रेस पक्षाने पूर्ण जोमाने कार्य करुन पक्ष संघटना बळकट करावी व समाजात दुफळी निर्माण करणाऱ्या विघातक शक्तींचा पराभव करावा असे ते पुढे म्हणाले. 

या बैठकीला काँग्रेस विधीमंडळ गट नेते आमदार दिगंबर कामत, सरचिटणीस सुभाष फळदेसाई व प्रदीप नाईक तसेच दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष जोसेफ डायस उपस्थित होते. यावेळी गट स्तरावर प्रामाणिकपणे व पक्षाची शिस्त पाळून प्रत्येक गटांनी काम करावे व काँग्रेस पक्षाला नवचेतना आणावी असे आवाहन त्यांनी उपस्थित गट अध्यक्षांना केले. राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे काम केवळ काँग्रेस पक्षाचे सरकार करू शकते असे गिरीश चोडणकर म्हणाले. भ्रष्टाचाराला गोवा लोकायुक्तांचे प्रशस्तीपत्र लाभलेले गोव्यातील भाजप सरकार हे एकमेव आहे असा टोला दिगंबर कामत यांनी हाणला. 

सरचिटणीस सुभाष फळदेसाई यांनी सर्व गट समितींचा आढावा या बैठकीत घेतला व गट अध्यक्षांना काँग्रेसचे कार्यक्रम राबविण्यास मार्गदर्शन केले. काँग्रेसची सदस्यता मोहीम अधिक नेटाने पुढे नेण्याचे त्यांनी सर्व गट अध्यक्षांना सांगितले. या बैठकीला पुष्कल सावंत (कुडचडे), आसिझ नोरोन्हा (कुंकळ्ळी), गोपाळ नाईक ( मडगाव), मान्युएल कुलासो (केपे), मान्युएल डिकोस्ता (नूवे), प्रलय भगत ( काणकोण), रोयन वियेगस (वेळ्ळी), इमरान शेख (वास्को), महेश नाईक ( मार्मागोवा) हे गट अध्यक्ष उपस्थित होते. 

काँग्रेसच्या इतर गट अध्यक्षांबरोबर प्रदेश अध्यक्ष व विधीमंडळ गट नेते यांच्या बैठका सप्टेंबर अखेरपर्यंत सुरूच राहणार असून गांधी जयंतीदिनी २ ऑक्टोबरपासून सर्व गट समित्या कार्यरत करण्याचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com