Goa BJP: मोरजीतील भाजपाचे कार्यकर्ते मगोत दाखल

मागच्या पाच वर्षापूर्वी चुकीचा आमदार निवडल्याने विकासासाला खिळ बसली: जीत आरोलकर
Goa BJP: मोरजीतील भाजपाचे 
कार्यकर्ते मगोत दाखल
Goa BJP: मगो पक्षात प्रवेश केलेले दिगंबर दाभोलकर, कुंदन मोरजे, सोबत जीत आरोलकर,माजी सरपंच सुभाष आसोलकर व इतरDainik Gomantak

मोरजी: 2022 ची निवडणूक जाहीर आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर मांद्रे मतदार संघातील काही भाजपा समर्थक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून मगोला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीची जसजसी तारीख जवळ येत आहे तसतसे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात येण्याजाण्यासाठी चढाओढ लागलेली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (Goa BJP Latest News)

Goa BJP: मगो पक्षात प्रवेश केलेले दिगंबर दाभोलकर, कुंदन मोरजे, सोबत जीत आरोलकर,माजी सरपंच सुभाष आसोलकर व इतर
ठरलं, गोव्यात भाजप लढवणार 40 जागा, मंगळवारी जाहीर होणार यादी

मोरजी (Morjim) येथील भाजपा समर्थक आणि भाजपा (BJP) ओबीसी सदस्य दिगंबर दाभोलकर, भाजपचे बूथ अध्यक्ष कृष्णा सावंत, सचिव कुंदन मोरजे, धनंजय दाभोलकर, सुशांत मोरजे येशवंत तेम्ब्कर, महादेव कान्नायिक , उमेश कासकर, रघुवीर गडेकर, संतोष दाभोलकर, विष्णू पुरखे, अशोक मोरजे, जीवन दाभोलकर, जॉनी फर्नांडीस, सुनील तेम्बकर, मीनानाथ टाककर, निशाल मोरजे, बाबुराव हुले, तुकाराम दाभोलकर, अनिल धुरत, फ्रान्सिस फर्नांडीस, आदींनी मगो पक्षात प्रवेश केला. यावेळ मगोचे अधिकृत उमेदवार जीत आरोलकर आणि मांद्रेचे माजी सरपंच सुभाष आसोलकर आदी उपस्थित होते.

मगोचे (MGP) नेते जीत आरोलकर यांनी यांनी सर्वांना मगो पक्षात प्रवेश दिला.

यावेळी जीत आरोलकर यांनी बोलताना मांद्रे मतदार संघात मागच्या पाच वर्षापूर्वी चुकीचा आमदार निवडल्याने विकासासाला खिळ बसली, गरजवंताना नोकऱ्या देण्याऐवजी अगोदर आपल्या सग्या सोयऱ्याना नोकऱ्या आमदार सोपटे यांनी दिल्याचा दावा जीत आरोलकर यांनी केला.

मान्द्रें मतदार संघातील अनेक भाजपाचे कार्यकर्त्ये भाजपा सोडून मगो पक्षात येत आहेत त्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो. मगो पक्षच राज्यात परिवर्तन घडवू शकतो हा साक्षात्कार अनेकाना झाल्यामुळे मगो पक्षात येत आहे. मगो पक्षाला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मांद्रे मतदार संघात यंदा इतिहास घडणार असल्याचा विश्वास जीत आरोलकर यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.