साखळीत भाजप कार्यकर्त्यांकडून आमदार खंवटेच्या प्रतिमेचे दहन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ''लक्ष्य'' करताना कोणते ना कोणते तरी कारण पुढे करून सतत त्यांच्यावर नाहक टिका करीत असल्याचा आरोप साखळीतील भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. 

डिचोली: पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ''लक्ष्य'' करताना कोणते ना कोणते तरी कारण पुढे करून सतत त्यांच्यावर नाहक टिका करीत असल्याचा आरोप साखळीतील भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. 

या प्रकाराबद्‌दल भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. आमदार खंवटे यांच्या या कृत्यामुळे नाराज बनलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. १६) साखळीत आमदार खंवटे यांच्या विरोधात निदर्शने करीत त्यांचा कडाडून निषेध केला. 

आमदार खंवटे यांच्या नाहक टिका सत्रामुळे नाराज आणि संतप्त बनलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आमदार खवंटे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही केले. 

साखळी भाजप मंडळाचे अध्यक्ष गोपाळ सुर्लकर आणि युवा मोर्चा अध्यक्ष ॲड. दिपेश गावस यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या निषेध सभेत साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर, नगरसेवक दयानंद बोरयेकर, आनंद काणेकर, रश्‍मी देसाई, अनुसूचित जमात महामंडळाचे संचालक तथा सुर्लाचे पंच सुभाष फोंडेकर, हरवळेचे सरपंच गुरुप्रसाद नाईक, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुभाष मळीक, युवा मोर्चाचे मिलींद नाईक, प्रा. संतोष मळीक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या