Goa : भाजपच्या गाभा समितीत सरकारच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर

Goa : भाजपच्या गाभा समितीत सरकारच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर
Goa BJPs core committee dissatisfied with the governments management

पणजी :  कोविड (Corona) काळात सरकारला खलनायक बनवण्यात आले आणि सरकार (Governments) ती प्रतिमा कशी पुसू शकले नाही याचे सविस्तर विवेचन भाजपच्या गाभा समितीत (BJPs core committee) करण्यात आले. सर्वात शेवटी झालेल्या बैठकीत सरकारच्या कोविड व्यवस्थापनाच्या कारभाराविषयीही (Management) चिंता व्यक्त करण्यात आली. संघटनात्मक तयारीचा आढावा म्हणता म्हणता भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी विधानसभा निवडणूक तयारीचा राजकीय आढावा घेतला. या आढाव्यातून भाजपसाठी फारसे उत्साहवर्धक चित्र पुढे आलेले नाही. उलट, असंतोषाची चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सहा महिन्यांनी निवडणूक झाली तर भाजप किती जागा जिंकू शकेल हा प्रश्नचिन्ह उभा ठाकला आहे.

संतोष (Santosh) यांनी राज्य विश्रामगृहात प्रत्येक मंत्र्याशी व्यक्तिश: चर्चा केली. त्यावेळी कोणताही स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawand) यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अपक्ष सहकारी गोविंद गावडे यांच्यासह सर्व मंत्र्यांनी संतोष यांच्यासमोर हजेरी लावली. या बैठकांतून सरकारविषयी जनतेचे काय म्हणणे आहे, हे संतोष यांना समजून आले. बुधवारी आमदारांच्या चर्चेवेळी समोर न आलेले मुद्दे या बैठकीनंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी समोर आले. मंत्र्यांकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंमत दिली जात नाही. मंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळत नाही, असे विषयही तावातावाने मांडण्यात आले. 

‘त्या’ नेत्याबाबत
या बैठका सुरू असतानाच कॉंग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची खबर प्रसारित झाली होती. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना विचारले असता ते म्हणाले, अशा कोणत्याही नेत्याचा भाजप प्रवेश होत असल्याचे निदान मला माहिती नाही.
मायकल लोबो म्हणतात 

क्षमतेनुसार उमेदवारी द्या
ग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो म्हणाले, विजयी होण्याची क्षमता तपासूनच उमेदवारी द्यावी असे मी सुचवले आहे. मागील निवडणुकीत मंत्री पडले त्यामुळे आता अभ्यास करूनच उमेदवारी द्या असे माझे म्हणणे आहे. मी काय सांगतो ते त्यांना समजले आहे आणि पुन्हा त्यांनी एकास एक पद्धतीच्या बैठकीला बोलावतो असे सांगितले आहे. विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेताना त्यांनी सरकारच्या कारभाराविषयी प्रश्न विचारले. बार्देश तालुक्यातील पक्षकार्याची माहिती माझ्याकडून घेतली. जास्तीत जास्त जागा जिंकण्याची तयारी करा असे त्यांचे म्हणणे आहे.

संघटन सचिव म्हणून पहिलाच दाैरा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या बैठकांनंतर सांगितले, की राज्य प्रभारी सी. टी. रवी व राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी गुरुवारी सायंकाळपासून बैठका घेतल्या आहेत. गेले बरेच दिवस कोविडचा प्रादुर्भाव असल्याने त्यांनी दौरा केला नव्हता. संघटन सचिव झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचा बलिदान दिवस आहे तर  ६ जुलै रोजी त्यांची जयंती आहे. त्यादिवशी वृक्षारोपण केले जाणार आहे. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. सहा महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली तरी त्यांचा दौरा हा पूर्णतः संघटनात्मक आढाव्यासाठीच होता. ते महाराष्ट्रात गेले होते तेथे तर निवडणूक नाही.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष गोव्यात आले आहेत. त्यांच्या बैठकांत याशिवाय अन्य विषय नाही. निवडणूक तयारी याच विषयावर चर्चा झाली.

     
- प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
भाजप संघटना आणि सरकारने निवडणुकीला सामोरे जाताना कशी तयारी केली पाहिजे याविषयी संतोष यांनी मार्गदर्शन केले. सर्वसाधारण लोकांचे म्हणणे, प्रश्न कोणते याविषयी सर्वसाधारण चर्चा त्यांनी केली.          
- नीलेश काब्राल, वीजमंत्री  
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प वेळेत पूर्ण करा, लोकांत मिसळत रहा, मतदारसंघाकडे अधिक लक्ष पुरवा अशा सूचना संतोष यांनी केल्या आहेत. खासदार विनय तेंडुलकर हे माझे मित्र व ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या विधानांविषयी (सावर्डे मतदारसंघात उमेदवारी हवी) कोणाशीही चर्चा केलेली नाही व करू इच्छित नाही.    
- दीपक पाऊसकर, सार्वजनिक बांधकाममंत्री

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com