Goa: राज्यात मिरीचे उत्पादन घटणार

मिरीच्या काढणीसाठी सर्वाधिक खर्च येत असतो त्यामुळे मिरी विक्रीतून मिळणारे उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसत नाही
Goa: राज्यात मिरीचे उत्पादन घटणार
मिरीची वेलDainik Gomantak

काणकोण: राज्यात यंदा मिरीचे उत्पादन घटणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.यंदा एप्रिल-मे महिन्यात पाऊस (Rain) झाल्याने मिरी वेलीला शेंगा लवकर लोंबकळू लागल्या मात्र त्यांना मिरीचे दाणे धरले नाहीत त्यामुळे मिरीचे उत्पादन (Production) कमी होणार असल्याचे पैंगीण येथील एक बागायतदार विजयकुमार प्रभूगावकर यांनी सांगितले.

ऑगस्ट महिन्यात मिरीचा दर 385 प्रति किलो होता तर सफेद मिरीचा दर 450 रूपये प्रतिकिलो होता.सद्या काळ्या मिरीचा दर 420 रूपये प्रति किलो आहे. मिरीचे उत्पादन तयार होण्यास सात ते आठ महिन्याचा कालावधी लागतो.

मिरीची वेल
Goa: श्रीधरन पिल्लाई सासष्टी व काणकोण मधील विद्यार्थी वसतिगृहाना देणार भेट

राज्यात डिसेंबर- जानेवारी महिन्यात मिरीची काढणी केली जाते त्याकाळात मिरीच्या दरात घसरण होते.मिरीच्या काढणीसाठी सर्वाधिक खर्च येत असतो त्यामुळे मिरी विक्रीतून मिळणारे उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसत नाही त्यासाठी मिरीला हमी भाव देण्याची गरज बागायतदार (Horticulturist) विजयकुमार प्रभूगावकर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com