Goa Board : 9 वी, 11 वीची परीक्षा होणार ऑनलाईन

online exam
online exam

पणजी -  गोवा (Goa) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 9 व 11 वीच्या पुढील वर्षभरातील परीक्षांबाबत गुण देण्याची पध्दत कशी असेल याबाबत आज 
परिपत्रक (Circular) जारी केले आहे. कोरोना संकटामुळे ( corona crisis ) पहिली तिमाही परीक्षा ऑनलाइन (exam online) पद्धतीने होणार असली, तरी त्यानंतरच्या परीक्षा कोरोना परिस्थिती पाहून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. (Goa Board : 9th, 11th exams will be online)

9  वीच्या नॉन प्रॅक्टिकल विषयाबाबत पहिली तिमाही परीक्षा 20  गुणांची असेल. दुसरी तिमाही परीक्षा 20 गुणांची, असायमेंटसाठी 10 गुण, तिसरी तिमाही परीक्षा 20  गुणांची, चौथी तिमाही परीक्षा 20  गुणांची आणि प्रकल्पासाठी10 गुण असे 100  गुण असतील. त्याच बरोबर 9  वी नॉन प्रॅक्टिकल वर्गातील पहिल्या तिमाही परीक्षेला 20  गुण असतील. दुसऱ्या तिमाही परीक्षेला 20  गुण, पहिली प्रॅक्टिकल10 गुणांची, तिसरी तिमाही परीक्षा 20  गुणांची, चौथी तिमाही परीक्षा 20  गुणांची आणि दुसरी टर्म प्रॅक्टिकल 10  गुणांची असेल.  एकूण 100  गुणांची परीक्षा असेल.

11  वीच्या वर्गासाठी नॉन प्रॅक्टिकल विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिली तिमाही परीक्षा 20  गुणांची, दुसरी परीक्षा २० गुणांची,  असाइन्मेंटसाठी १० गुण, तिसरी तिमाही परीक्षा 20  गुणांची, चौथी तिमाही परीक्षा २० गुणांची व प्रकल्पासाठी १० गुण असे एकूण १०० गुण असणार आहेत. प्रॅक्टिकल विषय घेतलेल्यांसाठी पहिली तिमाही परीक्षा  20 गुणांची (हे गुण 10 गुणांमध्ये परिवर्तित होणार आहेत), दुसरी तिमाही परीक्षा 15 गुणांची, पहिली प्रॅक्टिकल परिक्षा  25  गुणांची,  तिसरी तिमाही परीक्षा  20  गुणांची ( यामध्ये हे 20 गुण10 गुणांमध्ये परिवर्तन होतील), चौथी  परीक्षा 15  गुणांची व दुसरी टर्म प्रॅक्टिकल 25 गुणांची असे एकूण 100  गुण असणार आहेत.

पहिली तिमाही परीक्षा जुलैच्या शेवटी घेण्यात येतील, तर दुसऱ्या तिमाही परीक्षा सप्टेंबरच्या शेवटी होतील. तिसऱ्या तिमाही परीक्षा जानेवारीच्या मध्यास होतील, तर चौथ्या तिमाही परीक्षा मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार आहेत. 33 टक्के गुण हे उत्तीर्ण होण्यासाठी गृहीत धरले जाणार आहेत.नववीच्या पुरवणी परीक्षा थिअरीसाठी30 गुण दिले जातील ( जे 60  गुणांमध्ये परिवर्तन होतील.) नियमित परिक्षेसाठी 20  गुण आणि प्रॅक्टिकल असाईनमेंट प्रकल्पासाठी 20 गुण असे एकूण 100 गुण दिले जाणार आहेत. अकरावी पुरवणी परीक्षेतील व्होकेशनल कोर्ससाठी थिअरीसाठी 40 गुण, नियमित चाचणीसाठी 20 गुण व प्रॅक्टिकल असाइन्टमेंटसाठी 50 गुण मिळणार आहेत असे एकूण 100 गुण असतील.  

21  जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू

21  जूनपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होत असून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यात येणार असले, तरी शिक्षक आणि 
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 21 जूनपासून शाळांमध्ये उपस्थिती  लावावी लागणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक आज शिक्षण खात्याने जारी केले आहे.

कोविड मोहिमेतून शिक्षक मुक्त

कोविड नियंत्रण मोहिमेत सहभागी शिक्षकांना त्या कामातून जिल्हाधिकाऱ्यांनी मुक्त केले आहे. तसेच लसीकरण, कोविड निगा केंद्रे यासाठी घेतलेल्या शाळांच्या इमारती परत हस्तांतरित केल्या आहेत. शिक्षकांना कोविड कामातून मुक्त करावे अशी मागणी गोवा राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com