गोवा बोर्ड परीक्षा 2021: दहावीची  गोवा बोर्डाची परीक्षा 20 मे पासून

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा 20 मे पासून घेण्याचे निश्चित केले आहे.

पणजी:  गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा 20 मे पासून घेण्याचे निश्चित केले आहे. यंदा परीक्षेस 23 हजार विद्यार्थी बसणार आहे. मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये यांनी ही माहिती दिली आहे.

असा असणार टाइम टेबल

20 मे - मराठी भाषा द्वितीय

21 मे- राज्यशास्त्र

22 मे- भूगोल

23 मे- इंग्रजी, मराठी, उर्दू प्रथम भाषा

27 मे- हिंदी, फ्रेंच द्वितीय

28 मे- इंग्रजी, कोकणी, मराठी, उर्दू, संस्कृत आदी तृतीय भाषा

29 मे- समाजशास्त्र

30 मे- समाजशास्र

1 जून- विज्ञान

गोवा बोर्डाच्या 10 वी आणि 12वी च्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी राज्याच्या शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जावून हे वेळापत्रक बघावे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या कोणत्याही टाइम टेबल वर विश्वास ठेवू नये. दरम्यान गोवा राज्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग 21 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात येणार आले आहेत. त्यासाठी शिक्षण संचालनालयाच्या पथकाने शाळांची तपासणी केली आहे होती.

गोव्यातील 12वींच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

प्रत्‍येक वर्गात 12 विद्यार्थी मर्यादा

शिक्षण संचालकांशी ‘गोमन्तक''ने संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितले की, संचालनालयाने 21 नोव्हेंबर पासून दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी ठरविली होती. संचालनालयातर्फे एका पथकाने शाळांची काय तयारी झाली आहे, याची पाहणी केली होता. त्यात शाळांनी बैठक व्यवस्था व परिसर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आल्याचे दिसून आले होते. एका वर्गात 12 विद्यार्थी अशी व्यवस्था असल्याने दोन विद्यार्थ्यांमध्ये भरपूर अंतर ठेवण्यात आले होते.

गोव्यात चोवीस तासांत 42 जण कोरोनामुक्त 

संबंधित बातम्या