Goa Latest News: 'विद्यार्थ्यांना वाचनाशिवाय पर्याय नाही' - दिलीप बेतकेकर

Goa Latest News: पिळगांव येथील आयडियल हायस्कूलच्या ‘वाचनोत्सव’ साजरा
Book |Goa News
Book |Goa News Dainik Gomantak

Goa Latest News: वाचन माणसाला समृध्द बनवते. आज 21व्या शतकात विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही,असे प्रतिपादन विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप बेतकेकर यांनी केले.

पिळगांव येथील आयडियल हायस्कूलच्या ‘वाचनोत्सव’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राजेंद्र सावईकर, शाळेचे अध्यक्ष रामचंद्र गर्दे व मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गांवकर उपस्थित होते.

वाचनोत्सवात उपस्थित विद्यार्थ्यांसाठी वाचनाशी निगडित उपक्रम राबविण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करणे व वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे हाच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.

Book |Goa News
Minor Girl Abduction Case: वार्कातील अल्पवयीन मुलीला पळावणारा संशयित वाराणसीत गजाआड

उत्कृष्ट अशा ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वाचनोत्सव सोहळा शाळेच्या सभागृहात पार पडला. ग्रंथ गीताने सुरूवात झाली व त्यानंतर ग्रंथपूजन करण्यात आले.शेवटी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन सुभाष सावईकर यांनी केले. प्रास्ताविक ज्योत्स्ना नाईक यांनी केले. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गांवकर यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com