डिचोलीतील न्यूवाडा-वन येथे घरावर वीज कोसळून पितापूत्र जखमी

आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेमार्फत सोनुर्लेकर कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार (MLA) प्रवीण झाट्ये यांनी दिले आहे.
डिचोलीतील न्यूवाडा-वन येथे घरावर वीज कोसळून पितापूत्र जखमी
वीज पडलेले घर Dainik Gomantak

लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह डिचोली शहरापासून जवळच असलेल्या वन गावात एका घरावर वीज कोसळली. या घटनेत सुदैवाने पितापूत्र बचावले. मात्र विजेचा जबर धक्का बसल्याने पितापूत्र जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी न्यू वाडा-वन येथे घडली. या घटनेत विजेचा धक्का बसल्याने संजय सोनुर्लेकर (Sanjay Sonurlekar) आणि त्यांचा दहा वर्षीय मुलगा साहिल जखमी झाला.

जखमी पितापुत्राला उपचारार्थ डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात (health center) दाखल करण्यात आल्यानंतर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विजेचा लोळ घरात घुसल्याने विजेवरील उपकरणे आदी साहित्य जळून निकामी झाले. या घटनेत सोनुर्लेकर यांचे एक लाखाहून अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

वीज पडलेले घर
Goa Rain Updates: राज्यात बुधवारपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी

अशी कोसळली वीज

विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह रविवारी दुपारी डिचोलीत सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. ढगांच्या गडगडाटात न्यू वाडा -वन येथील संजय सोनुर्लेकर यांच्या घराशेजारील माडावर विजेचा लोळ कोसळला. हा लोळ सोनुर्लेकर यांच्या घरातील स्वछतागृहाच्या भिंतीतून घरात घुसला. या घटनेत छपरावरील पत्रे फुटले. घरातील वीज जोडणी जळून खाक झाली. विजेवरील उपकरणेही (Equipment) निकामी झाली. विजेच्या या लोळाचा जबर धक्का घरात असलेले संजय सोनुर्लेकर आणि त्यांचा मुलगा साहिल यांना बसला. लागलीच संजय आणि त्यांचा मुलगा साहिल यांना उपचारार्थ डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

आमदारांकडून मदत

दरम्यान, या घटनेनंतर मयेचे आमदार (MLA) प्रवीण झाट्ये यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन सोनुर्लेकर कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी आमदारांकडून सोनुर्लेकर कुटुंबाला तातडीची मदत देण्यात आली. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेमार्फत सोनुर्लेकर कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले आहे. यावेळी स्थानिक सरपंच (Sarpanch) शीतल सावळ, अंकिता न्हावेलकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com