Goa: सोनारभाट-शिरवई येथील पूल धोकादायक

Goa: कुशावती नदीवर खास कॅनॉलसाठी बांधण्यात आलेल्या पुलातून पाणी झिरपू लागल्याने हा पूल (Dangerous Bridge) कोणत्याही क्षणी कोसळू शकतो.
Goa: Bridge Getting Dangerous in Sonarbhat, Shirvai.
Goa: Bridge Getting Dangerous in Sonarbhat, Shirvai.Dainik Gomantak

केपे : सोनारभाट-शिरवई (Sonarbhat-Shirvai, Goa) येथील कुशावती नदीवर खास कॅनॉलसाठी बांधण्यात आलेल्या पुलातून पाणी झिरपू लागल्याने हा पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, असे लोकांचे म्हणणे आहे. या पुलावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे पुलाची ही स्थिती झाल्याचे लोकांनी सांगितले. सोनारभाट येथील कुशावती नदीवर हा पूल सुमारे ३५ वर्षांपूर्वी बांधला होता. कॅनॉलचे पाणी वाहून नेण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. हा कॅनॉल साळावलीला सुरू होऊन कुंकळी पोलिस स्थानकापर्यंत जातो. सोनारभाट भागातील पादचारी व दुचाकीस्वार केपेला येण्यासाठी वापरतात, पण बऱ्याचवेळा या पुलावरून चिरे वाहतूक करणारे ट्रक जात असल्याने या पुलाची दयनीय स्थिती निर्माण झाली आहे, असे लोकांनी सांगितले.

Goa: Bridge Getting Dangerous in Sonarbhat, Shirvai.
Goa: आता राहिली फक्त माती अन् कटू स्मृती!

हा पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत असल्याने या पुलावरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वार व पादचाऱ्यांसाठी धोकादायक बनला आहे. संबंधित खात्याने त्वरित या पुलाची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.

परवानगी नसतानाही चारचाकी वाहतूक

या विषयी जलस्रोत खात्याचे साहाय्‍यक अभियंता सोमनाथ देसाई यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, की या पुलाच्या दोन्ही बाजूंनी चारचाकी वाहतूक रोखण्यासाठी खांब उभारले होते. पण, अज्ञात व्यक्तींनी दोन्ही बाजूचे खांब उखडून काढले आहेत व वाहतूक केली जात आहे. त्याचप्रमाणे पुलाची डागडुजी करण्यासाठी या वर्षी कॅनॉलचे संपूर्ण पाणी सुकेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Goa: Bridge Getting Dangerous in Sonarbhat, Shirvai.
Goa Flood: मागच्या पुरात कोसळलेली घरं अजूनही उभी राहीली नाहीत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com