Goa: व्यक्तीगत स्वार्थासाठी अविश्वास ठराव आणला- स्वाती गवंडी
corgoa.jpg

Goa: व्यक्तीगत स्वार्थासाठी अविश्वास ठराव आणला- स्वाती गवंडी

भाजप (bjp) समर्थक आणि उपमुख्यमंञी बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांच्या कट्टर समर्थक असलेल्या कोरगावच्या सरपंचा स्वाती गवंडी (Swati Gawandi) यांच्यावर गुरुवारी 10 रोजी आठ पंचसदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस नोटिस पेडणे तालुका गटविकास कार्यालयात दिली. होती यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी पंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत उपसरपंच समील भाटलेकर (Samil Bhatlekar) यांनी  ठराव मांडला  त्याला पंचसदस्य उमा साळगावकर (Uma Salgaonkar) व प्रमीला देसाई (Pramila Desai) अनुमोदन देऊन ठराव आठ विरुद्ध शून्य मतांनी संमत करण्यात आला.

यावेळी उपसरपंच समील भाटलेकर, पंच उमा साळगावकर , अब्दुल नाईक (Abdul Naik) प्रमिला देसाई, महादेव पालयेकर, उदय पालयेकर, वसंत देसाई व कुस्तान कुयेलो हे  आठही सदस्य उपस्थित होते . निरीक्षक  म्हणून पेडणे गटविकास कार्यालयाचे मुरारी वराडकर उपस्थित होते. त्यांना पंचायत सचिव श्री तिळवे यांनी सहकार्य केले. (Goa Bringes no confidence motion for personal gain Swati Gawandi)

या अविश्वास ठराव नोटीसमध्ये सरपंच हे  पंचायत वार्डाच्या विकासामध्ये कोणत्याही प्रकारचे लक्ष घालत नाही. सदस्यांच्या  प्रश्नांना  योग्य प्रकारे उत्तरे देत नाहीत. पंचसदस्यांना विश्वासात न घेता स्वतंत्र निर्णय घेतात. पंचायतीच्या कामात सहकार्य करत नाही अशी कारणे  दाखल केलेल्या ठरावावेळी सांगण्यात आली.   
  

 पंचसदस्यांनी आपल्या स्वार्थासाठी आपल्याला अविश्वास ठराव  दाखल करुन संमत केलाः उपसरापंच स्वाती गवंडी

कोरगावाच्या माजी सरपंच स्वाती गवंडी  यांनी आपल्यावर अविश्वास ठराव नोटीसीत जे आरोप केले व त्यानंतर  बैठकीत चर्चेवेळी पञकारांकडे  केलेले सर्व  आरोप  स्वाती गवंडी यांनी पञकार परिषद घेऊन  फेटाळून लावले. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्यावर  अविश्वास ठराव दाखल करुन संमत केला. आपल्या वैयक्तिक स्वर्थासाठी ही खेळी खेळली गेली असून आपण गेल्या दीड वर्षाच्या  कोरोना  काळात नागरिकांना आपल्या परिने चांगले कार्य करत सहकार्य केले. कुणाचीही अडवणूक केली नाही. आपण आपल्या कार्यकाळत उत्तर गोवा खासदार यांच्या खासदार निधीतून कोरगाव पंचायत क्षेत्रात  कोनाडी ते भाईड पर्यंत  रस्त्यावर वीज खांब नव्हते ते काम केले.

त्या म्हणाल्या  सरपंचपद हे महिलांसाठी राखीव आहे.एकूण नऊ पंचसदस्य असलेल्या  पंचायतीमध्ये उपमुख्यमंञी यांच्या सोबत बैठक होऊन पाच वर्षे पैंकी अडिच वर्षे सुरुवातीला प्रमिला देसाई तर नंतरची अडिच वर्षे स्वाती गवंडी यांना सरपंचपद देण्याचे अलिखित करारानुसार ठरले होते. तर उपसरपंचपद हे पुरुष चार पंचसदस्यांना ठराविक काळासाठी विभागून घेण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत सर्व सुरळीत सुरु होते.

माञ आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच  अविश्वास ठराव आणला. आपण पंचसदस्य उमा साळगावकर यांना शेवटचे सहा महिने आपल्याला  दिलेले सरपंचपदाचे देण्यार असे सांगितले होते.माञ तसे न होता अगोदरच अविश्वास ठराव दाखल केला. उपमुख्यमंञी बाबू आजगावकर   यांनी ठरवून दिलेल्या कार्यकाळाला  आणि त्यांच्या  शब्दाला  पंचायतीचे इतर सदस्य जागले नाही याचे वाईट  वाटते असे माजी सरपंच  यांनी ठराव संमत झाल्यानंतर घेतालेल्या पञकार परिषदेत  स्वाती गवंडी यांनी सांगितलं .
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com