Goa Budget 2021: शेती-समुद्र या घटकांवर गोव्याची अर्थव्यवस्था टिकणार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

गोव्याची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यात आता शेती व समुद्र हे महत्त्वाचे घटक भागीदार असतील असा दावा केंद्रीय मत्स्योद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, राज्य सरकारसोबत दोन बैठका झाल्या आहेत.

पणजी: गोव्याची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यात आता शेती व समुद्र हे महत्त्वाचे घटक भागीदार असतील असा दावा केंद्रीय मत्स्योद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, राज्य सरकारसोबत दोन बैठका झाल्या आहेत.आज आणखीन एक बैठक होणार आहे. या बैठकीनंतर गोव्याच्या अर्थकारणाला दिशा देणारी नेमकी योजना काय यांची माहिती मी उद्या रविवारी देणार आहे. भाजपच्या येथील मुख्यालयात त्यांची पत्रकार परिषद झाली.यावेळी उपमुख्य मंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले, गोवा अनेक बाबतीत आत्मनिर्भर म्हणजेच स्वयंपूर्ण बनू शकतो यासाठी शेती आणि समुद्र याचा योग्य वापर राज्याने केला पाहिजे.

त्यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून काय करु शकते यावर विचार सुरू आहे. त्याविषयी उद्यापर्यंत निश्चित योजना तयार होईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल. केंद्र सरकारने गोव्याच्या मुक्ती दिनाची साठ वर्षे साजरी करण्यासाठी 300 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे यावरून गोव्याला केलं सरकार किती महत्त्व देते हे लक्षात येते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्यासोबत काल बैठक झाली आज उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्यासोबत बैठक आहे, यानंतरच गोव्याला मदत देण्याविषयीच्या धोरणाला अंतिम रूप देण्यात येणार आहे. उद्या भाजपच्या राज्य कार्यकारणीला मी संबोधित करणार आहे त्यानंतर पत्रकारांना संबोधित करताना मी या योजनेची सविस्तर माहिती देईन.

गोवा सरकारला केंद्रीय योजनांची भरीव मदत: पशुसंवर्धन मंत्री गिरीराजसिंह -

संबंधित बातम्या