Goa Budget 2021: गोव्यातील सर्व रस्‍त्‍यांचे हॉटमिक्स डांबरीकरण; तर साधनसुविधा विकासा निधीतून होणार 'ही' कामे पूर्ण

Goa Budget 2021: गोव्यातील सर्व रस्‍त्‍यांचे  हॉटमिक्स डांबरीकरण; तर साधनसुविधा विकासा निधीतून होणार 'ही' कामे पूर्ण
Goa Budget 2021 Chief Minister Dr Pramod Sawant informed that all the roads in Goa will be asphalted by hot mix method in the next four months

पणजी: राज्यातील सर्व रस्त्यांचे येत्या चार महिन्यांमध्ये हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली. रायबंदर बगल मार्गासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. सुर्ला ते बामणी उजगाव या 8.30 किलोमीटर रस्त्यासाठी सात कोटी वीस लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

वाळपई ते ठाणे रस्त्यासाठी साडेचार कोटी रुपये वाळपई, भिरवंडे, अडवई, पिसुर्ले, होंडा रस्त्यासाठी 9.80 कोटी रुपये खर्च केले जातील, तर रस्‍तेदुरुस्‍तीसाठी 600 कोटींची तरतूद केली आहे.

साधनसुविधा विकास महामंडळासाठी 450 कोटी

गोवा साधनसुविधा विकास महामंडळासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 450 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारक, रावणफोंड मडगाव येथे सहा पदरी उड्डाणपूल मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी गोदाम, म्हापसा येथील बस स्थानक, कुडचडे परिसरातील होडार येथे चार पदरी पूल यासह अन्‍य कामे या महामंडळाच्या माध्यमातून सरकार हाती घेणार आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या कामांवर गोवा प्रगती प्लॅटफॉर्म या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.

या महामंडळाने बांधलेल्या उच्च न्यायालय संकुलाचे उद्‍घाटन येत्या शनिवारी करण्यात येणार असल्याची माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जवळ आश्रम शाळेची इमारत महामंडळ बांधत आहे. याशिवाय वाणिज्य कर खात्याचे मुख्यालय आणि साखळी येथील बस स्थानक आणि लघु आगार यांचे काम आहे. महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले आहेत. राज्यात विकासकामे मार्गी लावण्यासाठी अभियांत्रिकी व्यावसायिकांसाठी मुख्यमंत्री रोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे पदवी आणि पदविका घेतलेल्या अभियंत्यांना कंत्राटे मिळवताना शुल्कामध्ये मोठी सूट देण्यात आली आहे. त्यांना पूर्वी काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र देण्यातूनही मुभा देण्यात आलेली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com