Goa Budget 2021: कोरोना काळातही गोव्याची अर्थव्यवस्था कशी सावरली?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 25 मार्च 2021

गोवा राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी 1719.89 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत 16.60 टक्के जास्त तरतूद केली आहे.

पणजी:  गोवा राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्यासाठी 1719.89 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत 16.60 टक्के जास्त तरतूद केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्प सादर करताना नमूद केले की, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात हृदयरोग विकार उपचार कक्ष सुरू केला जाणार आहे. तुये, काकोडा आणि केळशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे इमारती पूर्ण होत आलेले आहेत. लवकरात त्याचे उद्‍घाटन केले जाणार आहे व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विशेष उपचार कक्ष वेगळे इमारतीत सुरू केला जात आहे. 366 कोटी त्यावर खर्च करण्यात आलेला आहे. तेथे वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी यंदा 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

गोवा दंत वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत बांधून पूर्ण करण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कर्करोग उपचार केंद्रासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यातच आता कर्करोगावर उपचार करणे त्यामुळे शक्य होणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला दंत उपचार मिळावे यासाठी फिरती दंत उपचार बस उपलब्ध केली जाणार आहे. 100 खाटांचे मानसोपचार इस्पितळ आहे. मानसिक रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी 17.33 कोटी रुपये खर्चून दिवस सुश्रुषा केंद्र सुरू केले जाणार आहे. साखळी आरोग्य केंद्रात सुसज्ज नेत्रचिकित्सा केंद्र सुरू करण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात 500 खाटा असतील. त्या इस्पितळाची उद्‍घाटन तारीख एप्रिल महिन्यात निश्‍चित केली जाईल.

गोवा विधानसभेचे जेष्ठ सदस्य प्रतापसिंह राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण 

कोरोना काळातही अर्थव्यवस्था सावरली!

राज्य सरकारतर्फे विधानसभेत मांडण्यात आलेल्या आर्थिक आढाव्यात कोरोना काळातही, 2020-21 या वर्षात सरकारने विविध पावले उचलून अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न केल्याचे  स्पष्ट केले. राज्यातील महसुलाचे प्रमुख स्रोत म्हणजे खाण उद्योग, पर्यटन आणि उत्पादन एकत्र असले तरी कोरोनाचा फटका बसल्याने प्रत्येक क्षेत्र टप्प झाल्याचे नमूद करून पर्यटन उद्योग तर मध्यंतरी शून्यावर आल्याचे म्हटले आहे, अशा प्रतिकूल स्थितीत राज्य सरकारने ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ आणि आत्मनिर्भर योजनेखाली राज्यातील जनतेला धीर देण्याचा सरकारने प्रयत्न केला, असा दावा करण्यात आला.

Goa Corona Update: गोव्यात एका दिवसात 133 ‘कोरोना’बाधित 

उद्योग क्षेत्रात जुलै 2020 पर्यंत 66,008 लाख रुपये गुंतवणुकीचे प्रस्ताव आले होते. त्या उद्योगांमध्ये 18,554 ये जणांना रोजगाराची संधी मिळेल, असा अंदाज होता. आर्थिक वर्षात 196 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली, त्यात 15.780 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली 7,428 जणांना आर्थिक विकास महामंडळातर्फे 22,275.69  लाख रुपये मंजुरी देण्यात आली, त्यापैकी 19,010.79 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. करोनासारख्या महामारीमुळे सर्व आर्थिक व्यवहार काही काळ बंद पडले. 

Goa Budget 2021: वित्तीय व्यवस्थापनावर भर; ‘संजीवनी’साठी 15 कोटींचे सहाय्‍य 

गेल्या वर्षात म्हणजे 2018-19 मध्ये हे उत्पन्न 57,786.09 कोटी रुपये होते, ते यंदा 2019-20 मध्ये वाढून 63,408.08 कोटी रुपये झाले आहे. ही वाढ 9.73 टक्के आहे. त्याचप्रमाणे दरडोई उत्पन्नातही उल्लेखनीय वाढ झाली आहे. एकूण भांडवली महसुलात १०.२१ टक्के वाढ झाली आहे, तर खर्चात 10.6 टक्‍के वाढ झाली आहे, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. फिरते आणि किरकोळ विक्रेते यांची राज्यातील संख्या 2,458 आहे. त्यापैकी 1,293 अर्जदारांपैकी 691 जणांना 50.70 लाख रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती सर्वेक्षणात देण्यात आली. नोव्हेंबर 2020 पर्यंत गोव्यात 25 लाख पर्यटक आल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या