Goa: फात्राडे - वार्का येथे पोलिसांच्या देखत आठ ठिकाणी धिरियो

दोन धिरयांवर गुन्हा नोंदवत चौघांवर एफआयआर (Goa)
Goa: फात्राडे - वार्का येथे पोलिसांच्या देखत आठ ठिकाणी धिरियो
Stop Bullfights (Goa)Dainik Gomantak

Margao: एका राजकारण्याच्या पुतण्याच्या (Politician Nephew) वाढदिवसानिमित्त (For birthdays) वार्का आणि फात्राडे (Varca & Fatrade) येथे मोठ्या प्रमाणावर धिरियो (Bull Fights) होणार ही 'गोमंतक'ने दिलेली बातमी खरी ठरली (Gomantak News). वार्का - फात्राडे परिसरात आठ ठिकाणी (Bullfights in 8 Places ) या झुंजी झाल्या. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त ठेवलेला असतानाही या झुंजी झाल्या. त्यानंतर पोलिसांनी दोन धिरयांवर गुन्हा नोंदवत चौघांवर एफआयआर दाखल केली(FIR Registered). (Goa)

Stop  Bullfights (Goa)
Goa Politics: मिकी पाशेको यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

यातील काही झुंजीच्या ठिकाणी स्वतः तो राजकारणी उपस्थित होता अशी माहिती मिळाली असून या झुंजी बंद करण्यास आलेल्या पोलिसांकडे त्यांची हुज्जत झाल्याचेही सांगण्यात येते. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास या झुंजी लावल्या गेल्या. त्यासाठी व्हाट्सअप्प ग्रुपवरून जाहिरातही केली गेली होती. या पूर्वी पीपल फॉर एनिमल्स या संघटनेच्या निमंत्रक नोर्मा आल्वारीस यांनी अशा प्रकारे धिरयांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पोलिसांना कळविले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com