Goa: गोव्यात बिगर गोमंतकीयांचा धंदा तेजीत

गोवा राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर बिगर गोमंतकीयांचा धंदा (Goa)
राष्ट्रीय महामार्गावर बसलेले बिगर गोमंतकीय फळ विक्रेते (Goa )
राष्ट्रीय महामार्गावर बसलेले बिगर गोमंतकीय फळ विक्रेते (Goa )Dainik Goamantak

Goa: पेडणे तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) तसेच गावातील मुख्य रस्त्याच्या बाजूला स्थानिक व्यावसायिकांनी (Local Businessman) व्यवसाय थाटला तर लगेच पंचायत मंडळ किंवा पालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी येऊन कारवाई करताना मागे-पुढे पाहत नाहीत. मात्र बिगरगोमंतकीय व्यावसायिकांनी (Non Goan Businessman) व्यवसाय केला तर त्याला अडवण्यासाठी कोणतेही प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी धजावत नाही.

कोरोना महामारीचा (Corona Epidemic) लाभ उठवत अनेक बिगर गोमंतकीय व्यावसायिक गावातील किंवा शहरातील बाजार पेठेत न बसता थेट रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क करून आपल्या सामानाची विक्री करत असल्याचे चित्र गोव्यात बऱ्याच ठिकाणी दिसत आहे. पेडणे तालुक्यातील (Pernem Taluka) राष्ट्रीय आणि मुख्य रस्त्ये त्याला अपवाद कसे असणार. आता गोवा राज्यातील राष्ट्रीय महामार्ग (Goa State National Highway) हे हळू हळू बिगर गोमंतकीय व्यावसायिकांनी व्यापून जात असल्याचे चित्र सऱ्हास पाहायला मिळते. मात्र पालिका क्षेत्र, स्थानिक पंचायती किंवा सार्वजनिक बांधकाम रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे जाणवते.

राष्ट्रीय महामार्गावर बसलेले बिगर गोमंतकीय फळ विक्रेते (Goa )
Goa Handicrafts: सांगा हो आम्ही कसं जगायचं...

नागरिकही कोरोनाच्या काळात बाजारात गर्दी टाळण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बसत असलेल्या या फळ विक्रेत्यांकडून फळे विकत घेतात. एका बाजूने कोरोनाची महामारी आहे. तर दुसऱ्या बाजूने ठिकठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. आज धारगळ येथील राष्ट्रीय महामार्गावर बसलेल्या फळ विक्रेत्याकडे संपर्क साधला असता आम्ही स्थानिक पंचायतीला सोपो (शासकीय शुल्क) देतो, मात्र ते सोपोची स्लीप दाखावण्यास असमर्थ ठरले, सोपो घेणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला असता त्यांनी सोपो वसूलण्याची वेळ ही अनियमित असल्याचे सांगितले.

सदर फळ विक्रेते कोरोना विषयक कोणतीही नियमावली ना पाळता व्यवसाय करतात. तसेच बऱ्याच वेळा त्याच्याकडून घेतलेली फळे कुजलेली असल्याचे पाहायला मिळाले आहे. अश्या फळ विक्रेत्यांकडून फळे घेण्यासाठी थांबलेल्या वाहनांमुळे अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. सजग नागरिक सुर्यकांत चोडणकर यांनी प्रतिक्रिया देताना स्थानिक पंचायतीने अश्या गोष्टींची दखल घेवून अगोदर स्थानिक भुमिपुत्रांना व्यवसायासाठी वाव द्यावा व रस्त्यावर जे बिगर गोमंतकीय व्यावसायिक धंदा करतात त्यांना वेळीच रोखावे, असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com