Goa Latest News: 'एकही बेकायदा बांधकाम होऊ देणार नाही' - लक्ष्मीदास चिमुलककर

Goa Latest News: प्रशासकांनी दिलेल्या परवानगीचे पूर्णपणे उल्लंघन झाल्याचा दावा
Laxmidas Chimulakkar |Goa News
Laxmidas Chimulakkar |Goa News Dainik Gomantak

Goa News: हणजुण-कायसुवच्या सरपंचपदाचा ताबा घेतल्यापासून आपण व आपल्या मंडळाकडून एकाही अवैध बांधकामास मंजुरी दिलेली नाही, तसेच सरकारचे पाठबळ असल्यास यापुढे गावांत एकही बेकायदा बांधकाम होऊ देणार नाही,असे सरपंच लक्ष्मीदास चिमुलककर यांनी सांगितले.

प्रभाग 1 मधील सर्वे क्र. 213/17 आणि 213/18 मधील सीआरझेड क्षेत्रात मोडणाऱ्या जागेत, वॉटर्स बीच लॉंज ॲन्ड ग्रील्स प्रा.ली. कंपनीकडून विनापरवाना होत असलेल्या बांधकामाची पंचायत मंडळाने पाहाणी केली. त्यानंतर चिमुलकर पत्रकारांशी बोलत होते.

स्थानिक पंचसदस्य सुरेंद्र गोवेकर यांनी येथील वादग्रस्त बांधकामासंदर्भात पंचायत कार्यालयात रितसर तक्रार नोंदवली असून स्थानिक पंचायतीला अंधारात ठेवून संबंधित कंपनीकडून याभागात दोन मजली लोखंडी सज्जांचे पक्के बांधकाम केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Laxmidas Chimulakkar |Goa News
IFFI Goa: हजारो रुपये खर्च करूनही इफ्फीत तिकीट मिळेना? प्रेक्षक, आयोजकांत जुंपली

27 जुलै रोजी संबंधित कंपनीला लाकडी सज्जांचे रेस्टॉरंट तसेच शौचालय उभारण्याची परवानगी पंचायतीवर नियुक्त प्रशासकांनी दिल्याचा दावा संबंधित कंपनी करीत आहे. मात्र पंचायतीकडून कंपनीला प्रशासकांनी दिलेल्या परवानगीचे पूर्णपणे उल्लंघन झाल्याचा दावा पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर यांनी केला आहे. यावेळी पंच सदस्य सुरेंद्र गोवेकर, दिनेश पाटील, सुदेश पार्सेकर तसेच हणजुण-कायसुव पंचायत सचिव धर्मेंद्र गोवेकर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com