Goa : कळंगुटला झोपडपट्टीवासीयांचा होतोय जाच

Goa : रस्त्यांवर पसरतेय मलनिस्सारण प्रकल्पाचे दुर्गंधीयुक्त पाणी : आरोग्‍याचाही प्रश्‍‍न
Goa : कळंगुटला झोपडपट्टीवासीयांचा होतोय जाच
Goa : Illegal huts in Aradi Bardez Goa.Dainik Gomantak

शिवोली : कळंगुट मतदारसंघाला (Calangute Constituency) अनेक समस्यांनी घेरले आहे. झोपडपट्टीवासीयांचा लोकांना जाच होत आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीत (Criminal) होणारी वाढ, अनियमबद्ध वाढते काँक्रीटीकरण आणि डोंगरकापणीचे वाढते प्रकार, त्यातच रस्त्यांवर पसरणारे मलनिस्सारण प्रकल्पाचे दुर्गंधीयुक्त पाणी, यामुळे पर्यटकांना (Tourist) भुरळ घालणारा हा मतदारसंघ लोकांच्या नजरेतून उतरत आहे.

Goa : Illegal huts in Aradi Bardez Goa.
Goa: मांद्रे ऑफ कॉलेजला एका टप्प्यात अनुदान देणार; मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही

जागतिक कीर्तीचे स्थान आणि गोव्याची शान असलेल्या बार्देशातील कळंगुटला सध्या सर्वांत मोठे ग्रहण लागलेली जागा म्हणजेच कांदोळी पंचायत क्षेत्रातील आराडी ही परप्रांतीय लोकांनी झोपडपट्टीच्या माध्यमातून व्यापलेली विशाल जागा होय. विविध प्रकारे त्यांचा स्थानिकांना जाचही होत आहे. आजच्या घडीस भावी आमदार ठरवण्याचे सामर्थ्य असलेल्या तेथील झोपडपट्टीने सध्या सर्वांचीच झोप उडवलेली आहे. इतकेच नव्हे, तर मनात आल्यास आमदारकीसाठी स्वत:च्याच समुदायाचा उमेदवार कळंगुट मतदारसंघात उभा ठाकण्याची हिंमत येथील झोपडपट्टीत निर्माण झालेली आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

ठरतेय व्‍होट बँक
कळंगुटचे तत्कालीन आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी स्वत:ची व्होट बँक म्हणून त्या झोपडपट्टीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप कित्येकदा होत असतो. तथापि, दुसऱ्या बाजूने विद्यमान आमदार मायकल लोबो यांनीदेखील त्याबाबतची स्वत:ची ठोस भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे याबाबत नेमका दोष कुणाला द्यावा, असा सवाल उपस्थित होत आहे. अलीकडच्या काळात मर्यादेची सीमा ओलांडून वाढलेली ही परप्रांतीय लोकांची वस्ती स्थानिकांना त्रासदायक ठरत आहे.

भूमिपुत्रांची चिंता बळावतेय
नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनात अशाच लोकांना भूमिपुत्र होण्याचा मान देणारे विधेयक संमत करण्यात आलेले आहे. त्यामुळे कळंगुटच्या भूमिपुत्रांची चिंता अधिकच वाढलेली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्या विधेयकाबाबत आता खुलासा केला असला, तरी त्या विधेयकास उद्देशून जागोजागी उमटणारे प्रतिसादही आता प्रकर्षाने दिसू लागले आहेत.

Goa : Illegal huts in Aradi Bardez Goa.
Goa: डिचोलीतील 'ती तीन घरे' अखेर प्रकाशमय

मलनिस्सारण समस्‍या कायम
शेकडो कोटी रुपये खर्चून हाती घेण्यात आलेल्या कळंगुटमधील मलनिस्सारण प्रकल्पामधून मुख्य रस्त्यावर झिरपणारे दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना त्रासदायक ठरलेले आहे. याबाबत आश्चर्याची बाब म्हणजे संबंधितांकडून त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असते. या भागातील स्थानिक लोक, देशी-विदेशी पर्यटक आणि पर्यटन व्यवसायात असलेले व्यवसायिक या घटकांना ही तर डोकेदुखीच ठरलेली आहे.

राजकारण्‍यांकडून लांगूलचालन
मुक्तीनंतरच्या काळात गोव्यात खुलेआम प्रवेश करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमुळे वाढलेली गुन्हेगारी तसेच स्थानिक राजकारण्यांकडून परप्रांतीय लोकांचे होणारे लांगूलचालन यामुळे शांत, सुशेगाद गोमंतकीयांची जणू झोपच उडालेली आहे. पुढील काळात झोप सोडाच, जगणेही मुश्किल होणार असल्याचे या भागातील लोकांचे म्हणणे आहे. पर्यटनाच्या नावाखाली चाललेला ड्रग्ज आणी वेश्या व्यवसाय स्थानिक लोकांच्या धर्मसंस्कृतीवर घाला घालणारा असल्याने देशविदेशात कळंगुटची अब्रू वेशीवर टांगली जात असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे ‘भीक नको परंतु कुत्रा आवरा’ अशीच स्थिती कळंगुटवासीयांची झालेली आहे.

डोंगरकापणीकडे दुर्लक्ष?
कांदोळी तसेच बागा हडफडे येथील डोंगरमाथ्यावर नवीन रहिवासी प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर डोंगरकापणी चालल्याच्या ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारी आहेत. मात्र, स्थानिक पंचायत तसेच मंत्री मायकल लोबो यांचे त्यासंदर्भात हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांना वाटते. कारवाई करण्याबाबत सरकारी यंत्रणा कूचकामी ठरत असल्याने आता यापुढे वने आणि डोंगरांचे रक्षण करण्यासाठी न्यायालयीन लढा देण्यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com