गोवा: सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांवर कलंगुट पोलिसांची धडक कारवाई

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 27 एप्रिल 2021

10,37,600 रुपये दंड वसूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी  मंत्रिमंडळाची तात्काळ बैठक बोलवली होती. महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांप्रमाणे गोव्यात लॉकडाऊन (Goa Lockdown) करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी केली आहे.\

''गोव्यात लॉकडाउन करण्याची गरज...

याच पार्श्वभूमीवर आता कलंगुट पोलिसांनी (Calangute Police) सार्वजनिक ठिकाणी (Pablic Place) फेस मास्क न घातल्याबद्दल 5,188 पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांवर गुन्हा दाखल केला असून यावर्षी 10,37,600 रुपये दंड वसूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Goa Calangute police crack down on those who do not wear masks in public places)

 

 

 

संबंधित बातम्या