Goa Crime News: कौटुंबिक वादातून काकाचा सुऱ्याने भोसकून खून

Goa Crime News: पुतण्याला पोलिस कोठडी
 Crime News | Goa News
Crime News | Goa News Dainik Gomantak

Goa Crime News: माड्डीतळप-लोलये येथे काकाचा सुऱ्याने भोसकून खून केल्याच्या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. या प्रकरणी काणकोण प्रथम सत्र न्यायालयाने अजय खरात (वय 27) याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आज त्याला काणकोण पोलिसांनी रिमांडसाठी प्रथम सत्र न्यायालयासमोर सादर केले होते. रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जानू सोनू खरात (42) यांचा कौटुंबिक वादातून अजय खरात (27) याने खून केला होता.

मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यावर तीन प्रमुख सुऱ्याच्या खोल जखमा सापडल्या असून लिव्हर व अन्य अवयवांना जबर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे काणकोणचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी सांगितले.

 Crime News | Goa News
Sanjay Barde Statement on Pravin Arlekar: आमदार प्रवीण आर्लेकरांवर पाण्‍याच्या चोरीचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

दुःखद वातावरणात झाले अंत्यसंस्कार

जानू खरात यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीनंतर नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या मृतदेहावर दुःखद वातावरणात पैंगीण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले असा परिवार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com